कोल्हापूरकरांचं एकच उत्तर, राजेश क्षीरसागर आमदार ! तिसऱ्यांदा विधानसभेवर प्रतिनिधीत्व !!
schedule23 Nov 24 person by visibility 87 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
कोल्हापूर उत्तरचं काय उत्तर हा गेले महिनाभर चर्चिला जाणाऱ्या प्रश्नावर शहरवासियांनी मतदानातून शिक्कामोर्तब केले. सातत्याने शिवसेनेच्या पाठीशी राहणाऱ्या कोल्हापूरने यंदाच्या निवडणुकीत धनुष्यबाणाला पसंती दिली आणि कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महायुतीतंर्गत शिवसेनेचे उमेदवार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे २९ हजार ४७२ मताधिक्क्यांनी विजयी झाले.या निवडणुकीत त्यांनी, महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांचा पराभव केला. तेरा फेरीपर्यंत जवळपास तीन हजार मतांनी पिछाडीवर असलेल्या क्षीरसागर यांनी चौदाव्या फेरीपासून मुसंडी मारत विजयाला गवसणी घातली. यापूर्वी २००९ व २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले होते. यंदाच्या विजयाने क्षीरसागर हे तिसऱ्यांदा आमदार बनले.
या निवडणुकीत क्षीरसागर यांना एकूण एक लाख दहा हजार ४७० मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार लाटकर यांना ८० हजार ७९८ मते मिळाली. कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची निवडणूक यंदा लक्षवेधी ठरली. काँग्रेसमध्ये उमेदवारीवरुन झालेला घोळ आणि महायुतीकडे इच्छुकांची संख्या यामुळे उमेदवार कोण असणार याकडे लक्ष होते. महायुतीकडून राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली. महायुतीकडून पहिल्यांदा लाटकर, पुन्हा मधुरिमाराजे पुन्हा लाटकर असा घोळ झाला.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण ११ उमेदवार रिंगणात होते. या मतदारसंघात मतदारसंघात ६५.५१ टकके मतदान झाले आहे. १,९७, ६६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतमोजणीच्या एकूण २३ फेऱ्या झाल्या. पहिली फेरी ते १३ वी फेरीपर्यंत लाटकर आघाडीवर होते. कसबाबावडा, लाइनबझार, सदरबझार, विचारेमाळ या भागातील मतांच्या मोजणीत लाटकर पुढे राहिले. तिसऱ्या फेरीअखेर लाटकर हे ३८३४ मतांनी आघाडीवर होते. लाटकर यांच्याकडे तेराव्या फेरीपर्यंत आघाडी होती. त्यानंतर मात्र उत्तरच्या निकालाचे पारडे फिरत गेले. कोल्हापूर शहरातील मतदारांनी महायुतीच्या बाजूने कौल दिला.
सोळाव्या फेरीअखेर लाटकर यांना निर्णायक आघाडी मिळाली. सोळाव्या फेरीअखेर लाटकर यांना ५९६६६ तर क्षीरसागर यांना ७४ हजार ९१९ मते मिळाली. या फेरीअखेर क्षीरसागर यांच्याकडे तेरा हजार ५४ इतकी भक्कम आघाडी लाभली. या मतांमध्ये सातत्याने वाढ होत गेली. मतमोजणीच्या एकूण २३ फेऱ्या झाल्या. क्षीरसागर यांना एक लाख दहा हजार ४७० मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार लाटकर यांना ८० हजार ७९८ मते मिळाली.