कागलचे पालकत्व हसन मुश्रीफांच्याकडेच, समरजितसिंह घाटगेंची लढत अपयशी
schedule23 Nov 24 person by visibility 51 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गटातटाचे टोकाचे राजकारण आणि नेते मंडळीभोवती फिरणारा मतदारसंघ म्हणून कागलची ओळख. यंदाच्या निवडणुकीतही कागलमध्ये अटीतटीची लढत झाली. हजारो कोटीची कामे, दांडगा जनसंपर्क, जवळपास वीस वर्षे मंत्रीपदाच्या माध्यमातील जनसेवा या बळावर निवडणूक जिंकण्याची आडाखे बांधणाऱ्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना विजयासाठी झुंझावे लागले. मंत्री मुश्रीफ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांच्यामध्ये येथे तुल्यबळ लढत झाली.
या निवडणुकीत मंत्री मुश्रीफ यांनी ११ हजार ५८१ मताधिक्क्यांनी विजय मिळवला. त्यांना, एक लाख ४५ हजार २६९ मते मिळाली. तर घाटगे यांना एक लाख ३३ हजार ६८८ मतापर्यंत मजल मारत मुश्रीफांना विजय सहज प्राप्त करु दिला नाही. विधानसभेच्या २०२४ मधील निवडणुकीत या मतदारसंघात यंदा महायुतीतंर्गत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून् पालकमंत्री हसन मुश्रीफ व महाविकास आघाडीतंर्गत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून समरजितसिंह घाटगे यांनी निवडणूक लढविली.
कागल मतदारसंघातील मतमोजणी २६ फेऱ्या झाल्या. ८२.५१ टक्के मतदान झाले. कागलमध्ये २, ८३, ५६८ मतदारांनी मतदान केले आहे. येथे अकरा उमेदवार आहेत. या ठिकाणी सुरुवातील मुश्रीफांना धक्के बसले. पोस्टल मतासह पहिल्या सहा फेरीत घाटगे आघाडीवर होते. त्यानंतर मात्र मुश्रीफ यांनी पिछाडी भरुन काढत घाटगे यांच्यावर आघाडी मिळवली. शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीच्या या लढतीत मुश्रीफ जिंकले. या विजयामुळे मुश्रीफ हे सहाव्यांदा विधानसभेवर निवडून आले. कागल तालुका, गडहिंग्लज शहर, कडगाव व उत्तूर मतदारसंघाचा या विधानसभा मतदारसंघात समावेश आहे. मुश्रीफांनी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या पाठीशी राहिले. येथे शरद पवार, जयंत पाटील यांनी मुश्रीफांच्या विरोधात सभा घेतल्या होत्या. दुसरीकडे घाटगे यांनी भाजपकडून निवडणुकीची तयारी केली होती. मात्र महायुतीत ही जाग ा अजित पवार गटाला गेली. त्यामुळे घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. पण विजयाची तुतारी फुंकण्यात ते अपयशी ठरले.