Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वीरशैव बँकेच्या अध्यक्षपदी सतीश घाळी, उपाध्यक्षपदी वैभव सावर्डेकर कोल्हापूरच्या क्रिएटिव्ह शिक्षकांचा अभ्यास दौरा, जागतिक स्तरावरील शाळा भेटीचाधूल चेहरे पे थी, लेकिन आईना साफ करता रहा ! मुश्रीफांचा संजय मंडलिकांना उद्देशून टोलानगरसेवकांच्या पसंतीतून गटनेत्याची निवड, घोषणा कोल्हापुरातून नव्हे भाजपा प्रदेशकडून होणारमहापौर - उपमहापौर निवड तीस किंवा ३१ जानेवारीला! महापालिकेने मागविले निवडीसंबंधी मार्गदर्शन ! !शिवसेनेतर्फे शिवसेनाप्रमुखांना अभिवादन, नूतन नगरसेवकांचा सत्कार क्रीडाई कोल्हापूरतर्फे तीस जानेवारीपासून चार दिवसीय दालन प्रदर्शन ! वास्तू विषयक १७० स्टॉल्सचा समावेश ! !भाजपकडून शिराळे, खाडे, देसाई, कुंभारांची नावे चर्चेत ! शिवसेनेचाही महापौरपदावर दावा !!कोल्हापूर - इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव !जिल्हा परिषदेची निवडणूक, कार्यकर्त्यांच्या सन्मानाची ! कार्यकर्त्यांना पद, राजकारणात मोठं करणं हा महाडिक पॅटर्न ! !

जाहिरात

 

खेलो इंडियात कोल्‍हापूरच्‍या भक्तीचा पदकांचा चौकार, संस्‍कृतीला कांस्‍य

schedule29 Nov 25 person by visibility 186 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  :  खेलो इंडिया विद्यापीठ स्‍पर्धेतील पाचव्‍या पर्वात कोल्‍हापूरच्‍या मुलींची मक्‍तेदारी दिसून आली. राधानगरीतील हमालीची मुलगी असणाऱ्या भक्‍ती वाडकरने ४ पदकाची लयलूट केली आहे तर घरात कुस्‍तीचा वारसा असणाऱ्या संस्‍कृती पाटीलने ज्‍युदोत कांस्य पदकाची कमाई करीत दिवस गाजविला. खेलो इंडिया विद्यापीठ स्‍पर्धेत पुणे, शिवाजी विद्यापीठीच्‍या खेळाडूंची विजयी घोडदौड कायम आहे. या यशात महाराष्ट्राची मुलींनी पदकाची बाजी मारली आहे.  
जलतरणमध्येही महाराष्ट्राच्‍या मुलींनी चमकदार कामगिरीचे प्रदर्शन घडवले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून खेळताना कोल्‍हापूरच्‍या भक्‍ती वाडकरने एक रौप्य, तीन कास्य पदकाचा चौकार झळकविला.  तिचे वडिल राहूल वाडकर हे कोल्‍हापूरमधील राधानगरी शासकीय धान्य गोदाम येथे हमालाची नोकरी करतात. भक्‍तीने ५० मीटर बॅकस्‍ट्रोकमध्ये रूपेरी यश संपादन केल्‍यानंतर २०० मीटर बॅकस्‍ट्रोक,  फ्रीस्‍टाईल व मिडले रिले शर्यतीत कांस्य पदकाची कमाई केली. पुण्यातील क्रीडा प्रबोधिनी ती कसून सराव करीत असते. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्‍या संस्‍कृती पाटीलने ज्‍युदोतील महिलांच्‍या ७८ किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली आहे. सलग दोन लढतीत गुजरात, पंजाबच्‍या खेळाडूंना पराभव करीत  उपांत्‍य फेरीत मजल मारली होती. कांस्य पदकाच्‍या लढतीत चंदिगडच्‍या अनूला पराभूत करीत  संस्‍कृतीने पर्दापणातच पदकाचा करिश्मा घडविला. पन्‍हाळा तालुक्यातील कोतोली गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच प्रकाश पाटील यांची संस्कृती ही कन्‍या असून तिचे आजोबा मारुती पाटील व चुलते अरूण पाटील  कुस्तीगीर होते. पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीत ती  सराव करत असते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes