+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!! adjustगोकुळमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustडीवाय पाटील फार्मसीतर्फे रविवारी मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह adjustछत्रपतींच्या सुनेच्या मोटारीचे कुपेकरांच्या कन्येने केले सारथ्य adjustकोल्हापूरसाठी २३ ! हातकणंगलेसाठी २७ उमेदवार लढणार !!
Screenshot_20240226_195247~2
schedule03 Oct 22 person by visibility 451 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शारदीय नवरात्र महोत्सवाचा आठवा दिवस महाअष्टमी‌. करवीर निवासिनी अंबाबाई देवीची अष्टमीला महिषासूरमर्दिनी रुपात पूजा बांधली आहे. आजच्याच दिवशी सर्व देवांच्या तेजातून प्रगटलेल्या अष्टादशभुजा दुर्गेने महिषासुराचा संहार केला होता. करवीरनिवासिनी अंबाबाईअर्थात परब्रम्हाची प्रधान प्रकृती. या रूपामध्ये जगदंबेने महिषासुरमर्दिनीचे उग्र रूप घेतले शक्तिपीठांच्या परंपरेप्रमाणे करवीरक्षेत्री आदिशक्तीचे स्वरूप असणाऱ्या माता सतीचे त्रिनेत्र पडले. तेथे देवीने महिष मर्दिनीरूपाने विहार केला अशी आख्यायिका आहे त्याला अनुसरूनच नवरात्राच्या या अष्टमीला करवीरनिवासिनीची महिषासुरमर्दिनी रूपातली अलंकार पूजा बांधली जाते.