+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही !
Screenshot_20240226_195247~2
schedule01 Oct 22 person by visibility 429 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात शनिवारी, (एक ऑक्टोबर 2022)  करवीर निवासिनी अंबाबाई  देवीची भुक्ती मुक्ती प्रदायिनी या रूपात पूजा सजली आहे. पूजे विषयी माहिती अशी, अगस्ती ऋषींनी रचलेल्या अष्टकात भुक्ती मुक्ती प्रदे देवी असा उल्लेख केलेला आहे. या भारत भूमीमध्ये अनेक तीर्थ आहेत कित्येक तीर्थ भुक्ती म्हणजे आयुष्याची सर्व सुखं देतात, भोग देतात तर काही तीर्थ ही मुक्ती देतात पण करवीर हे एकमात्र असे तीर्थ आहे जी भुक्ती आणि मुक्ती दोन्ही देतं. भुक्ती अर्थात जगण्याची सर्व सुखं आणि मुक्ती अर्थात पुन्हा जन्म मरणाचा फेरा न पाहण्याचं शाश्वत वरदान. करवीर क्षेत्री या दोन्ही गोष्टींची प्राप्ती होते कारण हे क्षेत्र या मोठ्या आईचं अर्थात महामातृकक्षेत्र म्हणून ओळखलं जातं.याच रूपात साकारलेली करवीर निवासिनीची आजची पूजा. चतुर्भुजा आदिशक्ती पुढे भक्ती अर्थात राज्यप्राप्तीच्या अभिलाषा देवीची सेवा करणारा सुरथ राजा आणि मुक्तीच्या अपेक्षेने देवीची उपासना करणारा समाधी वैश्य या रूपात असलेली ही पूजा गजानन मुनीश्वर, श्रीनिवास जोशी यांनी साकारली आहे.