+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा ! adjustदूध वाढीसाठी कुशिरेचं पुढचं पाऊल, करनाल, कोलारमधून आणले पशुधन adjustचेतन नरकेंची निवडणुकीतून माघार ! भविष्यात चार पावलांची झेप घेण्यासाठी दोन पाऊल मागे !! adjustहॅटस ऑफ, यूपीएससीत कोल्हापूरच्या तिघांचे यश
Screenshot_20240226_195247~2
schedule02 Oct 22 person by visibility 521 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
कसबा बावडा येथे धारदार कोयत्याने महिलेचा गळा चिरुन खून केल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयिताला कावळा नाका ताराराणी चौक येथे पाठलाग करून पकडले. कविता प्रमोद जाधव (वय ४४, रा. कसबा तारळे, ता. राधानगरी ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या गुन्ह्यातील संशयित राकेश शामराव संकपाळ (वय 32 रा. शहाजी नगर, कसबा बावडा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कविता जाधवने लग्नास नकार दिल्याने राकेशने तिचा खून केला अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. आज रविवारी दुपारी तीन ते चारच्या सुमारास कविता जाधव या महिलेचा कोयत्याने गळा चिरुन खून केल्याची घटना परिसरातील नागरिकांना कळाली. शहाजीनगर मध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी संशयिताचा शोध सुरू केला. संशयित पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक किरण भोसले यांनी ताराबाई चौक परिसरात संशयित राकेश संकपाळ याला पाठलाग करून पकडले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने कुणाची कबुली दिली.
संशयित राकेश संकपाळ हा सुतार काम करतो, तर मयत कविता जाधव ही शिवणकाम आणि छोटी मोठी कामे करून उदरनिर्वाह करत होती. चार वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले आहे. तिला तीन मुले आहेत . कविताही राकेशची नातलग होती. पतीच्या निधनानंतर राकेशचे तिच्या घरी येणे जाणे वाढले होते. रविवारी दुपारी आई-वडील घरी नसल्याने राकेशने कविताला फोन करून स्वतःच्या घरी बोलावून घेतले. त्याने तिच्याकडे लग्न करण्याचा तगादा लावला. मला तीन मुले असल्याने मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, असे कविताने सांगितल्यावर चिडलेल्या राकेशने घरात असलेल्या कोयत्याने कविताच्या गळ्यावर सपासप वार करून खून केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.