+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!! adjustगोकुळमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustडीवाय पाटील फार्मसीतर्फे रविवारी मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह adjustछत्रपतींच्या सुनेच्या मोटारीचे कुपेकरांच्या कन्येने केले सारथ्य adjustकोल्हापूरसाठी २३ ! हातकणंगलेसाठी २७ उमेदवार लढणार !!
Screenshot_20240226_195247~2
schedule29 May 23 person by visibility 468 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय जनता पक्ष, महानगर अध्यक्षदाच्या निवडीवरुन शहर भाजपातंर्गत धुसफूस सुरू असल्याचे वृत्त आहे. पक्षाच्या वाढीसाठी महानगर अध्यक्षपदी योग्य उमेदवार निवडा, विरोधी काँग्रेस नेत्यांच्या मर्जीनुसार काम करणारा नको अशा आशयाचे पोस्ट गेले दोन दिवस शहर भाजपाच्या वर्तुळात फिरत आहे. पक्षाच्या नेत्यांना उद्देशून लिहिलेले लेटर व्हायरल झाल्यामुळे संघटनेतील वाद चव्हाटयावर आला.
  दरम्यान भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये दोन दिवसापूर्वी राजारामपुरी परिसरात संघटनेचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतरही भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी, जुन्या पदाधिकाऱ्यांकडे महानगर अध्यक्ष निवडीवरुन प्रश्ने उपस्थित केली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साऱ्यांना बरोबर घेऊन जाणारा, खंबीर वृत्तीचा पदाधिकारी महानगर अध्यक्षपदी निवडावा अशी कार्यकर्त्यांची धारणा पत्रातून व्यक्त केली आहे. जुने व नवे हा सुद्धा भाजपातंर्गत धुसफुसीमागील कारण असल्याची चर्चा आहे. या साऱ्या कारणामुळे नव्या अध्यक्षांच्या निवडीच्या घोषणेला विलंब होत आहे.
  मुलाखती होऊन पंधरा दिवसाचा कालावधी उलटला तरी अद्याप अध्यक्षपदाचे नाव जाहीर होऊ शकले नाही. पक्षाचे निरीक्षक व माजी खासदार अमर साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सर्किट हाऊस येथे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत चर्चा झाली होती. महानगर अध्यक्षपदासाठी माजी नगरसेवक अजित ठाणेकर, विजय सुर्यवंशी, सरचिटणीस विजय जाधव, विद्यमान अध्यक्ष राहुल चिकोडे आणि माजी महापौर दिपक जाधव यांच्या नावांची चर्चा आहे. पुणे येथे झालेल्या पक्षाच्या राज्य कार्यकारिणीनंतर अध्यक्षांचे नाव जाहीर करण्यात येईल असे वृत्त होते. मात्र पंधरा दिवसाचा कालावधी उलटला तरी महानगर अध्यक्षपद कोणाला द्यायचे यावर एकमत झाले नाही.
दरम्यान गेले दोन दिवस भाजपा अंतर्गत एका लेटरने खळबळ उडवून दिली आहे. पक्षामध्ये एक चौकडी निर्माण झाली आहे. ही चौकडी, सामान्य कार्यकर्त्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यापर्यंत पोहचू देत नाही असेही त्यामध्ये म्हटले आहे. त्या पत्रामध्ये, महानगर अध्यक्षपदासाठी इच्छुक एका उमेदवारांविषयी तक्रारी नोंदविल्या आहेत. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणुकीचे संदर्भ दिले आहेत. या इच्छुक उमेदवारांपैकी एक जण, काँग्रेसच्या नेते मंडळीच्या कलेने वागत असल्याचे पत्रात म्हटले आहे. यापूर्वी पक्षात घडलेल्या काही घटना, आरोपांचा तपशील त्यामध्ये नोंदविला आहे. कोल्हापूर शहरात भाजपा संपवायचा आहे की वाढवायचा आहे ? असा सवाल या पत्रात आहे.
पक्ष निरीक्षकांनी, महानगर अध्यक्ष निवडीसाठी शहर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. इच्छुकांसोबत चर्चा झाली. मुलाखती होऊन निवडीची औपचारिकता शिल्लक असताना पक्षातंर्गत कुरघोडी व शह-काटशहाने उचल खाल्ली आहे. यामुळे महानगर अध्यक्षपदाच्या शर्यतीतून एकेक जण बाहेर कसा फेकला जाईल यादिशेनेही पडद्याआड खेळी होत असल्याचे सध्याच्या घडामोडीवरुन स्पष्ट होत असल्याचे सिनीअर पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. शिस्तबद्ध पक्षातही ऑल इज वेल नाही हेच यावरुन स्पष्ट होत असल्याचे कार्यकर्ते म्हणत आहेत. या घडामोडीवर नेते मंडळी काय निर्णय घेतात आणि कोणाची निवड करतात याकडे कार्यकर्त्याचे लक्ष लागले आहे.