+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...!
Screenshot_20240226_195247~2
schedule13 Jan 23 person by visibility 349 categoryजिल्हा परिषद
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर:  जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या सभासदांसाठी संचालक मंडळाने मोबाईल अँपकरिता रक्कम  तीस लाख रुपये इतका खर्च केलेला आहे. हे अँप फक्त सभासदांची संस्थेकडील असलेली खाती यामध्ये सेव्हिंग खाते , कर्ज खाते , ठेव खाते याची माहिती दिसून येते . तथापी संबंधित माहिती संस्थेमध्ये अपडेट केले नंतरच दिसून येते. या अँपद्वारे कोणत्याही प्रकारचे व्यवहार सभासदांना करता येत नाहीत. त्यासाठी तीस लाख रुपये खर्च करण्याचे गुपित काय असावा विरोधी या गाडीचे पॅनल प्रमुख सचिन जाधव यांनी केला आहे.   जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत सचिन जाधव  हे विरोधी राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडीचे नेतृत्व करत आहेत. मोबाईल ॲपच्या अनुषंगाने बोलताना सचिन जाधव म्हणाले" या अॅपद्वारे पैसे भरणे , पैसे वर्ग करणे या बाबी होवू शकत नाहीत . संस्थेकडे यापूर्वी थ्री स्टार इन्फोसिक या कंपनीमार्फत संस्थेचे संगणकीय कामकाज केले जाते . या कंपनीकडे यापूर्वी आपला संपूर्ण मास्टर डाटा उपलब्ध आहे . त्यामुळे संबंधित माहिती सभासदांना आपला हप्ता जमा झाल्यानंतर एसएमएसद्वारे सभासदांना कळत असताना पुन्हा मोबाईल अँपची गरजच काय ? हे समजून येत नाही. अँपव्दारे सभासदांना ऑनलाईन व्यवहार करायला मिळाले असते तर उद्देश सफल झाला असता . परंतु संस्थेकडे उपलब्ध असलेला डाटा पाहण्यासाठी स्थानिक बाजारपेठेमध्ये  अॅपची किंमत अंदाजे रक्कम रुपये पाच लाख मर्यादित झाली असती.       तथापि संस्थेने या अँपवर तीस लाख इतका खर्च का केला आहे याचे गुपित काय ? संस्थेने कोर्ट कामासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास ठोक रक्कम २५००० रुपये मानधनावर नियुक्त केले आहे व त्याच बरोबर कोर्ट कामासाठी पुन्हा वकीलांनाही अंदाजे पाच लक्ष रुपये फी आदा केली जाते. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास ठोक मानधनावर घेण्यापेक्षा त्याच वेतनामध्ये संस्थेच्या सभासदांच्या एखाद्या पाल्यास नियुक्ती देता आली असती. सभासदांनी भूलथापांना वा दबावाला बळी न पडता मतदान करावे.