महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " गोकुळसाठी आमदार सतेज पाटील यांचे कॉन्ट्रीब्युशन काय ? आयत्या पिठावर रेघोटया ओढण्याचे काम ते करत आहेत. जमीनीची मशागत एकाने करायची आणि पिके दुसऱ्याने घ्यायची असा हा सारा प्रकार आहे. त्यांचे गोकुळमधील नॉलेज टँकरपुरतेच मर्यादित आहे." अशी घणाघाती टीका गोकुळमधील विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी केली. दूध विक्री दरात बारा रुपये तर उत्पादकांना आठ रुपये अशी वाढ केली आहे. एका लिटरमध्ये चार रुपयाचा फरक आहे. रोज म्हैस दुधाच्या आठ लाख लिटर दुधाचा हिशोब केल्यास 32 लाख रुपये फरक मिळतो. 80 दिवसांतील फरकाची 24 कोटी 60 लाख रुपये इतकी रक्कम गेली कुठे असा सवालही त्यांनी केला..
गोकुळमध्ये सहकार विभागाच्या नियमावलींना फाटा देऊन कामकाज सुरू आहे, यापूर्वीच्या लेखापरीक्षणात त्रुटी आहेत. २०२१ पासूनच्या गोकुळच्या कारभाराचे शासकीय चाचणी लेखापरीक्षण करावे अशी मागणी महाडिक यांनी केली होती. त्यानुसार सहकार विभागाने गोकुळच्या शासकीय चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश दिलेले आहेत. येत्या आठवड्याभरात चाचणी लेखापरीक्षणाला सुरुवात होईल असेही महाडिकांनी सांगितले. दरम्यान गोकुळच्या शासकीय चाचणी लेखापरीक्षणाच्या संदर्भात पत्रकारांशी बोलताना गोकुळचे नेते व काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी, "गोकुळचे दोन वर्षाचे कशासाठी ? पंचवीस वर्षाचे शासकीय चाचणी लेखापरीक्षण करा" अशा शब्दात डिवचले होते. शिवाय राजकीय दबाव वापरून गोकुळचे शासकीय चाचणी लेखापरीक्षण करण्याचा आदेश काढल्याची टीका आमदार पाटील यांनी महाडिक यांच्यावर केली होती.
संचालिका शौमिका महाडिक यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार सतेज पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. महाडिक म्हणाल्या," गोकुळच्या गेल्या दोन वर्षापासूनच्या कामकाजाचे ऑडिट होणे गरजेचे आहे. सध्या गोकुळचा सगळा कारभार हा तोंडी आहे, त्याचे डॉक्युमेंटेशन काही नाही. सहकारी विभागाच्या कायद्याला, नियमांना फाटा देऊन काम सुरू आहे. संचालकांच्या अधिकारावर गदा आणली जात आहे. दूध उत्पादकांना फसवले जात आहे. मागील पंचवीस वर्षाच्या लेखापरीक्षणाची मागणी करणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी गोकुळच्या प्रगतीचा चढता आलेख पाहावा. मागील पंचवीस वर्षाच्या कालावधीतच गोकुळने 400 लिटर दूध संकलनापासून ते वार्षिक तीन हजार कोटीपर्यंतची उलाढाल अशी मोठी मजल मारलेली आहे. असेही महाडिक म्हणाल्या. "दरवाढी संदर्भातील महत्त्वाचे निर्णय हे संचालकांच्या बैठकीत होत नाहीत. चेअरमन, एमडी व ठराव नेत्यांच्या प्रदेश हे विशेष सीमित आहेत. वास्तविक गोकुळ सहकारी संस्था आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही हे गोकुळचे नेते म्हणवून घेणाऱ्यांनी ध्यानात घ्यावे. शिवाय आमदार हसन मुश्रीफ यांनीही गोकुळ संबंधी मी मांडलेल्या मुद्द्याविषयी मविचार करून वक्तव्य करावेत. ते मला ओळखत नसतील तर कागल मध्ये येऊन माझी ओळख करून देईन. मी मूळची कागलचीच आहे.गोकुळच्या ऑडिटचे आदेश हे माझ्या तक्रारीनुसार झाले आहे. कोणाच्या सांगणार नाही. मी गोकुळची संचालिका आहे, संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती मागणे हा माझा अधिकार आहे. गोकुळमधील सत्ताधारी मंडळी हे राजकारणासाठी गोकुळचा वापर करीत आहेत. गोकुळ साठी हे योग्य नाही. आमदार सतेज पाटील यांच्याकडून सातत्याने सत्तेचा गैरवापर होतो. ते मंत्रीपदावर असताना तर करण सहकार मंत्र्यांना सांगून राजाराम कारखान्याचे सभासद अपात्र केले. सभासदांच्या पात्रतेवरून कोर्टाने चपराक दिल्यामुळे ते आता गप्प आहेत. महापालिकेतील सत्तेचा गैरवापर करून त्यांनी राजाराम कारखान्याच्या बागेच्या जागेवर आरक्षण टाकण्याचा प्रयत्न केला. त्याने गोकुळ मधील राजकारणासाठी एका दिवसात संस्था वाढविल्या. संस्था वाढल्या मग दूध संकलन का वाढले नाही. दूध उत्पादन वाढीसाठी ते आता कर्मचारी वर्गावर दबाव टाकत आहेत. सत्ताधारी मंडळींच्या चुकीच्या कारभाराच्या विरोधात अनेक तक्रारी येत आहेत त्यामुळे गेल्या दोन वर्षातील कामकाजाचे ऑडिट होणे गरजेचे आहे." असेही महाडिक यांनी स्पष्ट केले.