महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : बालिंगा जल उपसा केंद्राकडील उच्चदाब वाहिनीच्या तांत्रिक कामकाजाकरीता महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी लि. यांच्याकडून सोमवारी 22 ऑगस्ट 2022 रोजी कामकाज पूर्ण होईपर्यंत विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये बालिंगा अशुध्द/शुध्द जल व नागदेववाडी अशुध्द जल उपसा केंद्रावरुन पाणी पुरवठा बंद रहाणार आहे. विद्युत पुरवठा बंइ होणार असल्याने सोमवारी बालिंगा जलशुध्दीकरण केंद्रावर अवलंबून असणा-या भागांना दैनंदिन पाणी पुरवठा होऊ शकणार नाही.
सोमवारी ए, बी, वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरातील लक्षतीर्थ वसाहत परिसर, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड परिसर, सानेगुरूजी परिसर, राजेसंभाजी परिसर, क्रशरचौक परिसर, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर परिसर, कणेरकरनगर परिसर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर परिसर, तुळजाभवानी कॉलनी परिसर, देवकर पाणंद परिसर, टेंभे रोड परिसर, शिवाजीपेठ परिसर, चंद्रेश्वरगल्ली परिसर, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर परिसर, उभा मारुती चौक परिसर, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड परिसर, मंगळवार पेठ काही भागांचा समावेश आहे. तर संपूर्ण सी डी वॉर्डमधील दुधाळी परिसर, गंगावेश परिसर, उत्तरेश्वरपेठ परिसर, शुक्रवार पेठ परिसर, ब्रम्हपुरी परिसर, बुधवारपेठ तालिम परिसर, सिध्दार्थनगर परिसर, पापाची तिकटी परिसर, लक्ष्मीपुरी परिसर, शनिवारपेठ चौक परिसर, सोमवारपेठ परिसर, ट्रेझरी ऑफीस परिसर, बिंदुचौक परिसर, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक परिसर, उमा टॉकीज परिसर, महालक्ष्मी मंदीर परिसर, गुजरी परिसर, मिरजकर तिकटी, देवलक्लब तसेच ई वॉर्डातील खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहूपूरी 5,6,7,8 वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक या परिसरात पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तरी या भागातील नागरीकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.