+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशाहूंचे शक्‍तीप्रदर्शन ! जनसागराच्या साक्षीने विजयाचा निर्धार पक्‍का!! adjustस्वाभिमानीचे शक्तीप्रदर्शन, शेट्टींनी बैलगाडीतून जाऊन अर्ज भरला adjustमुख्यमंत्र्यांनी घेतली महाडिकांची भेट, शिरोलीत दोन तास खलबतं ! adjustडीवाय पाटील इंजिनीअरिंगमध्ये टेक्निकल इव्हेंट उत्साहात adjust१०५ माजी नगरसेवकांचा संजय मंडलिकांना पाठिंबा adjustशाहू छत्रपती मंगळवारी अर्ज भरणार, महाविकास आघाडीकडून मोठे शक्तिप्रदर्शन ! adjustमहायुतीचे शक्ती प्रदर्शन ! मंडलिक, मानेंचा उमेदवारी अर्ज दाखल !! adjustप्रकाश आवाडेंची माघार, धैर्यशील मानेंना पाठिंबा ! adjust हातकणंगलेसाठी रात्रीस राजकारण चाले ! मुख्यमंत्र्यांनी घेतली कोरे, यड्रावकरांची भेट !! adjustसर्व्हेवर राजकारण चालत नाही, जनता सर्वेसर्वा- खासदार मानेंचा आवाडेंना टोला
Screenshot_20240226_195247~2
schedule16 Jan 23 person by visibility 358 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राज्य सरकारच्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेत विवेकानंद कॉलेजच्या विद्यार्थिनी शब्दा बालाजी वाघमोडे (बी.ए.भाग 1) हिने व्दितीय क्रमांक मिळविला. तिने कोल्हापूर जिल्हयातील पिशवी खोऱ्यातील (शाहूवाडी तालुका) जलयुक्त शिवार योजनेचा सुक्ष्म्‍ अभ्यास या विषयावरील संशोधन करुन त्याची माहिती मॉडेलव्दारे सादर केली.
या यशाबद्दल प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हास्तरीय स्पर्धा शाहू कॉलेज,कोल्हापूर येथे झाली. या स्पर्धेत विवेकानंदच्या श्रेया मांडेकर, शब्दा वाघमोडे व अंकिता वरुटे या तीन विद्यार्थिनींचा विविध श्रेणीमध्ये अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक आला. यातून श्रेया मांडेकर, शब्दा वाघमोडे या दोघींची विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली. त्यांनी मानवता, भाषा व ललितकला या श्रेणीतून स्पर्धेत सहभागी होऊन अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक मिळविला. यानंतर राज्य्‍स्तरावर विद्यापीठामार्फत श्रेया मांडेकर, शब्दा वाघमोडे यांनी शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष  प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सेक्रेटरी प्राचार्या शुभांगी गावडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  कौस्तुभ गावडे, यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थिनीला प्रा.सुनिल भोसले, डॉ.जी.एस.उबाळे, डॉ.शुभांगी काळे, डॉ. सुमैया इनामदार, श्री.सी.बी.दोडमणी यांचे मार्गदर्शन लाभले.