+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustरविवारपासून शहरात महायुतीच्या प्रचाराची रणधुमाळी - राजेश क्षीरसागर adjustडोंगळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळा adjustकोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराला मिसळ पे चर्चेचा तडका adjustवाळवा-शिराळा तालुक्यात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे
Screenshot_20240226_195247~2
schedule27 Sep 22 person by visibility 331 categoryशैक्षणिक
संस्थाचालक, प्राचार्य संघटना, विकास मंचसह अधिकार मंडळाच्या सदस्यांची बैठक
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीने नेहमीच विद्यापीठ विकास आणि विद्यार्थ्यांची उन्नतीला प्राधान्यक्रम कामकाज केले आहे. विद्यापीठाच्या आगामी काळात होणाऱ्या सिनेटसह विविध अधिकार मंडळाच्या निवडणुका शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली सगळेजण एकत्रित लढवू या. आणि विद्यापीठ विकास आघाडीचा विजय प्राप्त करु या’असे आवाहन विद्यापीठ विकास आघाडीचे प्रमुख डॉ. संजय डी. पाटील यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटसह व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद या अधिकार मंडळासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या तयारीसाठी विद्यापीठ विकास आघाडीची मंगळवारी सायंकाळी बैठक झाली.
या बैठकीत विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी संस्थाचालक, प्राचार्य संघटना, विद्यापीठ विकास मंचसह समविचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा व जिंकण्याचा निर्धार केला. प्राध्यापक गटातील जागाही अधिकाधिक जिंकण्यासंबंधी चर्चा झाली.
व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अमित कुलकर्णी यांनी आगामी निवडणुकीत विद्यापीठ विकास मंच हा विकास आघाडीसोबत असल्याचे सांगितले. विद्यापीठ विकास आघाडीमार्फत गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाची मांडणी सदस्यांनी केली. विद्यापीठाची कामगिरी, नॅकचा दर्जा, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, कॉलेज व प्राध्यापकांच्या प्रश्नांची सोडवणूक या साऱ्या विषयांचा उहापोह केला.
बैठकीत धैर्यशील पाटील, आमदार जयंत आसगावकर यांची भाषणे झाली. अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ. संजय डी. पाटील यांनी विद्यापीठ विकास आघाडी म्हणून आपण सगळे जण एकत्र आहोत. भाजपचे नेते, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी आपली चर्चा झाली आहे. पूर्वीसारखे सगळेजण एकत्रितपणे विद्यापीठाच्या निवडणूका लढवू या आणि सिनेटसह सर्वच अधिकार मंडळावर विकास आघाडीला विजयी करू या.’
……………..
मार्गदर्शन, कौतुक आणि कानही टोचले
शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, प्राचार्य डी. आर. मोरे, प्राचार्य व्ही. एम. पाटील, सिनेट सदस्य भैय्या माने यांनीही बैठकीत भाषण केले. त्यांनी, विद्यापीठ विकास आघाडीच्या कामगिरीचे कौतुकही केले. तसेच येत्या निवडणुकीनंतर निवडून येणाऱ्या सदस्यांनी अधिक प्रभावीपणे कामकाज करण्यासंबंधी चौघांनी मार्गदर्शनही केले. तसेच गेल्या पाच वर्षातील कामगिरीचा आढावा घेताना नाव न घेता काही सदस्यांच्या कामकाजावरुन कान ही टोचले. गतीमान कामकाजाची अपेक्षा व्यक्त केली.
……………….
संस्थाचालक, प्राचार्यांसह सदस्यांची उपस्थिती
विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, डॉ. आर.व्ही.शेजवळ, चित्रलेखा माने कदम, पृथ्वीराज गोडसे, सतीश घाळी, डॉ. जे. एफ. पाटील, डॉ. डी. यू. पवार, डॉ. आर. एस. आडसूळ, डॉ. भालबा विभूते, प्राचार्य सी. आर. गोडसे, डॉ. मेघा गुळवणी, डॉ. वासंती रासम, डॉ. प्रताप पाटील, प्राचार्य धनाजी कणसे, प्राचार्य सुरेश गवळी, प्राचार्य एल. बी. जाधव, डॉ. संजय जाधव आदी उपस्थित होते. प्रा. मधुकर पाटील यांनी सूत्रसंचालन केले.