+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही !
Screenshot_20240226_195247~2
schedule30 Jan 23 person by visibility 511 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : बांधकाम व्यवसायिकांची राज्यातील शिखर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रेडाई महाराष्ट्राची स२०२३-२५ ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. क्रेडाई महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी औरंगाबादचे प्रमोद खैरनार तर सचिवपदी कोल्हापूरचे विद्यानंद बेडेकर यांची निवड करण्यात आली.
रियल इस्टेट क्षेत्रात देशपातळीवर बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न मांडणारी व ग्राहकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी संघटना म्हणून क्रेडाई गेली अनेक
वर्षापासून देश पातळीवर संघटनात्मक कार्य करीत आहे. या संघटनेत ६२ सिटी चाप्टर समाविष्ट आहेत . क्रेडाई महाराष्ट्र संघटनेच्या २०२३-२०२५ या कालावधीसाठी कार्यकारी मंडळ जाहीर झाले. क्रेडाईचे राष्ट्रीय चेअरमन सतिश मगर यांनी क्रेडाई महाराष्ट्राची २०२३-२५ ची कार्यकारणी घोषित केली. विद्यानंद बेडेकर गेली १४ वर्षे क्रेडाई कोल्हापूरच्या विविध पदावर कार्यरत आहेत. सध्या क्रेडाई कोल्हापूरचे अध्यक्ष आहेत. दरम्यान क्रेडाई महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी औरंगाबादचे प्रमोद खैरनार, उपाध्यक्षपदी नागपूरचे महेश सातवानी, नाशिकचे सुनील कोतवाल, नवी मुंबईचे रसिक चव्हाण, पुण्याच्या आदित्य जावडेकर, जळगावचे अनिश शहा, कराडचे राजेंद्र यादव यांच्या निवडी करण्यात आले आहेत. सोलापूरचे सुनील फुरडे यांची आयपीपी म्हणून निवड झाली आहे
 सचिवपदी कोल्हापूरचे विद्यानंद बेडेकर, खजानिसपदी औरंगाबादचे नरेंद्रसिंग जाविंदा, सह सचिवपदी अकोल्याचे दिनेश ढगे, सांगलीचे रवींद्र खिलारे, धुळ्याचे शांताराम पाटील, लातूरचे धर्मवीर भारती, अहमदनगरचे आशिष पोखरणा, चिपळूणचे राजेश बाजे यांची निवड झाली.
 निवडीबद्दल बोलताना विद्यानंद बेडेकर म्हणाले, "माझ्यावर कंडाई महाराष्ट्राने सेक्रेटरी पद देऊन मोठी जबाबदारी दिली आहे. मला दिलेल्या बहुमानाचा व माझ्या अनुभवाचा उपयोग मी बांधकाम व्यावसायिक व ग्राहकांचे प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितच करेन. "