+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustहॅटस ऑफ, यूपीएससीत कोल्हापूरच्या तिघांचे यश adjustस्वीडनमध्ये मराठी कुटुंबातर्फे गुढीपाडव्याचे स्वागत adjustशाहूंचे शक्‍तीप्रदर्शन ! जनसागराच्या साक्षीने विजयाचा निर्धार पक्‍का!! adjustस्वाभिमानीचे शक्तीप्रदर्शन, शेट्टींनी बैलगाडीतून जाऊन अर्ज भरला adjustमुख्यमंत्र्यांनी घेतली महाडिकांची भेट, शिरोलीत दोन तास खलबतं ! adjustडीवाय पाटील इंजिनीअरिंगमध्ये टेक्निकल इव्हेंट उत्साहात adjust१०५ माजी नगरसेवकांचा संजय मंडलिकांना पाठिंबा adjustशाहू छत्रपती मंगळवारी अर्ज भरणार, महाविकास आघाडीकडून मोठे शक्तिप्रदर्शन ! adjustमहायुतीचे शक्ती प्रदर्शन ! मंडलिक, मानेंचा उमेदवारी अर्ज दाखल !! adjustप्रकाश आवाडेंची माघार, धैर्यशील मानेंना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule18 Jan 23 person by visibility 261 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शाहूपुरी, कुंभार गल्ली येथील श्री पंचमुखी गणेश सेवा भक्त मंडळाच्यावतीने येथील पंचमुखी गणेश मंदिरात गणेश जयंतीनिमित्ताने विविध धार्मिकव सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष सुनील पाटील व उपाध्यक्ष उदय कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
  गणेश जयंती २५ जानेवारी रोजी आहे. गणेश जयंतीच्या सप्ताहाची सुरुवात २० तारखेपासून होणार आहे. २० ते २६ जानेवारी पर्यंत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १९९५ मध्ये स्थापन केलेल्या पंचमुखी गणेश मंदिरास यावर्षी २८ वर्षे पूर्ण होत आहेत. दरवर्षी जन्मकाळ सोहळा साजरा केला जातो. त्यानुसार यंदाही महाआरती, सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, पारायण, भजन, श्रीगणेशाचा अभिषेक, जन्मकाळ व पालखी सोहळा असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित होणार आहेत.२६ जानेवारी रोजी महाप्रसाद वाटप होणार आहे . याशिवाय सामाजिक बांधिलकी जपत मंडळाच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. 
पत्रकार परिषदेस उत्सव कमिटी अध्यक्ष शुभम कुंभार,उपाध्यक्ष ओंकार पाटील, सचिव अरविंद जाधव, खजनिस शिवाजी बावडेकर, सतिश वडणगेकर, राजेश पठाण, उदय डवरी, अजय पाटील, सतिश कुंभार उपस्थित होते.