+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा ! adjustदूध वाढीसाठी कुशिरेचं पुढचं पाऊल, करनाल, कोलारमधून आणले पशुधन adjustचेतन नरकेंची निवडणुकीतून माघार ! भविष्यात चार पावलांची झेप घेण्यासाठी दोन पाऊल मागे !! adjustहॅटस ऑफ, यूपीएससीत कोल्हापूरच्या तिघांचे यश
Screenshot_20240226_195247~2
schedule18 Apr 23 person by visibility 426 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : बचत गटातील महिलांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)च्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.  नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प जिल्हास्तरीय कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेमध्ये घेण्यात आली. बैठकीला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकणेश गोडसे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) शिल्पा पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी उत्तम मदने, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे, विनायक कुलकर्णी आदी उपस्थित होते.
ऊसाबरोबरच अन्य पिकांच्या रोपवाटिका निर्मितीवरही भर द्यावा. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा, बालविवाह प्रतिबंध कायदा, लैंगिक छळ प्रतिबंध कायदा अशा महिलांशी संबंधित विविध कायद्यांबाबत बचत गटातील महिलांमध्ये जागृतता करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातील 6 लोकसंचलित साधन केंद्रामधील ११२ गावातील महिला बचत गटांमधील महिलांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करुन याद्वारे महिलांपर्यंत महत्वपूर्ण व आवश्यक माहिती पोहोचवावी, असे आवाहन चव्हाण यांनी केले.  
  " ऊस रोपवाटिका, शेळी, मेंढी, दुधाळ गाई, म्हैशी पालन मार्गदर्शन, आर्थिक साक्षरता प्रशिक्षण, जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांची माहिती व प्रशिक्षण, परसबाग लागवड मार्गदर्शन, पौष्टिक तृणधान्यांपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांची विक्री प्रदर्शन, महिला मेळावा, सकस आहाराविषयी जाणीव जागृती, आरोग्य विषयक जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येणार आहेत"असे जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे यांनी सांगितले.
     ******