+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश
Screenshot_20240226_195247~2
schedule02 Oct 22 person by visibility 448 categoryराजकीय
कोल्हापुरात हिंदूगर्वगर्जना संपर्क मेळावा
महाराष्ट्र : शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांवर चालणाऱ्या तळागाळातील शिवसैनिकांनी शिवसेना जिवंत ठेवली. प्रंसगी गुन्हे अंगावर घेवून आयुष्यभर कॉंग्रेस - राष्ट्रवादीला विरोध केला पण, तीच शिवसेना कॉंग्रेस - राष्ट्रवादीच्या विचारांवर चालू लागली आणि कडवट शिवसैनिकांना पदोपदी होणारा अवमान सहन न झाल्यानेच शिवसेनेत उठाव झाला.” ’असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.
कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह येथे शिंदे गटाच्या शिवसेनेचा हिंदूगर्वगर्जना मेळावा रविवारीं (ता.२ ऑक्टोबर) झाला. "जय भवानी जय शिवाजी", "शिवसेना जिंदाबाद", "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यानंतर शिवसेना कोल्हापूर जिल्हा व शहर शिवसेना व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावतीने पालकमंत्री केसरकर यांचा चांदीची तलवार व पुष्पगुच्छ देवून जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर जिल्ह्याच्या शिवसेनेस इतिहास आहे. ६ मे १९८६ च्या शिवसेनेच्या स्थापनेपासून पहिल्या दिवसापासून शिवसेनाप्रमुखांचे विचार घेवून रात्रंदिवस काम करून शिवसेना वाढविली. शिवसेनाप्रमुखांची शिकवण होती की, कॉंग्रेस - राष्ट्रवादीशी कदापि युती नाही. परंतु कॉंग्रेस - राष्ट्रवादीशी युतीची भूमिका पक्षप्रमुखांनी घेतल्याने अनेक कडवट शिवसैनिकांमध्ये घुसमट होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेत परिवर्तनाची लाट आणली. ”
………..
संजय पवारांनी कधीच शिवसेना वाढीचे काम केले नाही
क्षीरसागर म्हणाले, “जिल्हाप्रमुख म्हणून काम करणाऱ्या संजय पवार यांनी कधीच शिवसेना वाढीच काम केले नाही. प्रत्येक निवडणुकीत धनुष्यबाणाच्या विरोधात प्रचार केला. त्यामुळे शिवसेनेबद्दल बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. मातोश्रीचा आदेश पाळून मी पोटनिवडणुकीत कॉंग्रेस उमेदवाराचा प्रचार केला त्यांना निवडून आणले पण त्याचे बक्षीस संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देवून केले. पण जैसी करणी वैसी भरणी प्रमाणे पुरेसे संख्याबळ असूनही संजय पवार यांचा पराभव झाला, हे शिवसेनाप्रमुख बघत आहेत. ”
यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, युवा सेना जिल्हा अधिकारी चेतन शिंदे यांनीही मनोगते व्यक्त केली. खासदार धैर्यशील माने, युवा सेना राज्य कार्यकारणी सदस्य किरण साळी, जिल्हाप्रमुख रविंद्र माने, राहुल चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, जयवंत हारुगले, रणजीत जाधव, महेंद्र घाटगे, अशोक शिंदे, उदय भोसले, तुकाराम साळोखे, रमेश खाडे, संजय संकपाळ, बिंदू मोरे, प्रकाश सूर्यवंशी, मंगल साळोखे, पुजा भोर, पवित्रा रांगणेकर, युवासेनेचे प्रसाद चव्हाण, अमोल भास्कर उपस्थित होते. उपशहरप्रमुख अंकुश निपाणीकर यांनी प्रास्ताविक केले. उप-जिल्हाप्रमुख किशोर घाटगे यांनी आभार मानले.