+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule16 Jan 23 person by visibility 590 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या दूरदृष्टी व संकल्पनेतून साकारलेल्या गोकुळ दूध संघाने शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद फुलविला. सामान्य शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणारी व्यवस्था निर्माण झाली. सर्वसामान्य शेतकरी,  दूध उत्पादक महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे व गोकुळच्या विकासाचे जे स्वप्न आनंदराव पाटील चुयेकर यांनी पाहिले ते स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत. गोकुळ मिल्क मोबाईल ॲपच्या माध्यमातून अद्ययावत सुविधा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे" असे गौरवोद्गार गोकुळचे नेते व आमदार सतेज पाटील यांनी काढले.
 गोकुळ दूध संघाचे शिल्पकार  स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या नवव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून गोकुळ मिल्क ई सुविधा या मोबाईल अॅपचा लोकार्पण सोहळा सोमवारी (सोळा जानेवारी) झाला. गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालय परिसरातील स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या पुतळ्यास आमदार सतेज पाटील, गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील व संचालकांनी  पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात गोकुळ मिल्क सुविधा मोबाईल ॲपचा लोकार्पण करण्यात आला. आमदार सतेज पाटील म्हणाले, " स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांनी शेतकरी हा धर्म म्हणून आयुष्यभर काम केले. सामान्य शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी गोकुळच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना आखल्या. पक्ष आणि गटातटाच्या पलीकडे जाऊन शेतकरी हा केंद्रबिंदू म्हणून त्यांनी आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या विचार कार्याचा वारसा सांगताना गोकुळचा विस्तार आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचा विकास या दोन्ही गोष्टी साकार करणे ही गोकुळशी निगडीत प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. वीस लाख लिटर दूध संकलनाचे ध्येय समोर ठेवले आहे. ते साध्य करण्यासाठी गोकुळचे पदाधिकारी, संचालक, कर्मचारी सुपरवायझर, पुरवठादार या साऱ्यांनी एकसंधपणे काम केल्यास लवकरच ते साध्य होईल."
   गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले, "स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. गोकुळने नेहमीच शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून काम केले. मार्फत वेगवेगळ्या सेवा सुविधांची अंमलबजावणी केली. या विकासाभिमुख योजनांचा भाग म्हणून गोकुळ मार्फत सुरू असलेल्या सेवा सुविधा प्राथमिक दूध संस्था व दूध उत्पादकापर्यंत पोहोचाव्यात यासाठी गोकुळ मिल्क ई सुविधा मोबाईल ॲप मराठीतून तयार केले आहे. या मोबाईल ॲप द्वारे संस्थामार्फत संघास होणाऱ्या दैनंदिन दूध पुरवठ्याची माहिती, प्रत्येक दहा दिवसाच्या दूध बिला संबंधातील माहिती, संस्थांची पशुखाद्य मागणी, पशुवैद्यकीय सेवेसाठीची मागणी, वैरण बियाणे, चाफकटर, दूध तपासणी मशीन, विमा सेवा, संस्था तक्रार नोंद अशा वेगवेगळ्या सुविधा देण्यात येणार आहेत."
 संचालक अजित नरके यांनी स्वागत केले. एम. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला आमदार राजेश पाटील गोकुळ दूध संघाचे जेष्ठ संचालक अरुणकुमार डोंगळे, संचालक बाळासाहेब खाडे, प्रा.किसन चौगुले, बाबासाहेब चौगुले, चेतन नरके, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंजना रेडेकर, नंदकुमार ढेंगे, प्रकाश पाटील, एस.आर.पाटील, अंजना रेडेकर, युवराज पाटील, कार्यक्रम संचालक योगेश गोडबोले आदी उपस्थित होते.