+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustरविवारपासून शहरात महायुतीच्या प्रचाराची रणधुमाळी - राजेश क्षीरसागर adjustडोंगळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळा adjustकोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराला मिसळ पे चर्चेचा तडका adjustवाळवा-शिराळा तालुक्यात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे
Screenshot_20240226_195247~2
schedule18 Jan 23 person by visibility 305 categoryजिल्हा परिषद
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व आजरा तालुक्यातील काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते उमेश आपटे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. आजरा तालुक्यात काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती.   आपटे यांनी  जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, पक्षप्रतोद म्हणून जबाबदारी पार पडली होती.  आजरा कारखान्याचे संचालकपदही काम केले आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांच्याकडे पाठविलेल्या पत्रात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सदस्यपदासह सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.
 उमेश आपटे यांनी पत्रात म्हटले आहे, "माझे वडील कै. मुकुंदराव आपटे १९६५ पासून राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय कार्यकर्ते होते. या कालावधीत उत्तूरच्या सरपंचपदासह जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी १४ वर्ष राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे नेतृत्व कैले होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मी स्वतः गेली २० वर्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून १० वर्ष पंचायत समिती सदस्य, १० वर्ष जिल्हा परिषद सदस्य पदावर काम केले आहे. माझ्या पत्नी वैशाली आपटे यांनी गेली ५ वर्षे राष्ट्रीय
कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातून उत्तूरचे थेट सरपंचपद भूषविले आहे. मी व माझे सर्व आपटे कुटुंब आजअखेर पर्यंत राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे काम करीत आहोत तसेच माझ्या सोबत मतदार संघातील २२ गावात माझ्या कार्यकत्यांनी सहकार्यानी व वडिल्याच्या सोबत काम केलेल्या सहकार्यांनी राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष वाढवण्याचे काम केले आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने मला भरपूर पढ़े दिली. त्याचबरोबरच मी ही राष्ट्रीय काँग्रेस पक्षासाठी २० वर्ष कार्य केले आहे. पण आता राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना मला अनेक समस्या येत आहेत. माझ्या कौटुंबिक अडचणीमुळे मी पूर्णवेळ पक्षाचे काम करू शकत नाही.माझ्यामुळे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला कोणतीही समस्या, अडचण येऊ नये, याकरिता आजपासूनराष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सदस्यपदासह सर्व पदांचा मी राजीनामा देत आह आहे."