महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे २८ व २९ जानेवारी 2023 या कालावधीत दोन दिवसीय केएमए कॉन २०२३ या वैद्यकीय परिषदेचे आयोजन केले आहे अशी माहिती केएमएचे अध्यक्ष डॉ.गीता पिल्लाई व मानद सचिव डॉ. ए. बी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वैद्यकीय परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात होणारे बदल , आजाराचे निदान आणि उपचार या अनुषंगाने तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. कोल्हापूरसह राज्यातून ३०० हून अधिक डॉक्टर सहभागी होणार आहेत. शनिवारी (२८ जानेवारी) सायंकाळी सहा वाजता इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च नवी दिल्लीतील राष्ट्रीय प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. तसेच यावर्षीचा डॉ.अतुल जोगळेकर जीवन गौरव पुरस्कार कोल्हापुरातील जेष्ठ युरोलॉजिस्ट डॉ. प्रकाश गुणे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
[ या परिषदेमध्ये डॉ. गौतम अरोरा, डॉ. मन्सूअली सिताबखान डॉ.तन्मय ठोंबरे, ,अनिकेत मोहिते , डॉ. निनाद देशमुख, डॉ. वाशिम काझी, डॉ. वरून बाफना, डॉ.निकिता दोशी, डॉ. किरण दोशी, डॉ. सुरज पवार, डॉ. अक्षय शिवचंद, डॉ. चंद्रशेखर पेठे डॉ. विनय थोरात, डॉ. आदित्य कुलकर्णी, डॉ. विलास नाईक, डॉ. अर्जुन आडनाईक, अजिंक्य देशपांडे, डॉ. श्याम ठक्कर, डॉ. साईप्रसाद हे मार्गदर्शन करणार आहेत. हॉटेल सयाजी येथेही परिषद होत आहे.
पत्रकार परिषदेला वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. साईप्रसाद , उपाध्यक्ष डॉ.अभिजीत कोराणे, सचिव डॉ. संगीता निंबाळकर उपस्थित होते.