महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर : संभाजीनगर येथे २५ व २६ डिसेंबर २०२२' रोजी दोन दिवसीय मैत्रीण महोत्सव होत आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. अशी माहिती माजी नगरसेवक किरण नकाते व माधुरी नकाते यांनी दिली आहे.
संभाजीनगर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर हे महोत्सव होत आहे. या महोत्सवामध्ये गौरव आणि ग्रुपची लावणी, लौकिक अहिरे बॉलीवूड डान्स ग्रुपचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. महोत्सवात महिला बचत गटांचे स्टॉल, खाद्यपदार्थांचे स्टॉल असतील. यावेळी आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या नीलम तोडकर यांना मैत्रीण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी माजी आमदार अमल महाडिक, सुहास लटोरे, बांधकाम व्यवसायिक शंकर पाटील, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष भरत ओसवाल, भाजप ताराराणी आघाडीच्या माजी नगरसेवकांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.