+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustस्वाभिमानीचे शक्तीप्रदर्शन, शेट्टींनी बैलगाडीतून जाऊन अर्ज भरला adjustमुख्यमंत्र्यांनी घेतली महाडिकांची भेट, शिरोलीत दोन तास खलबतं ! adjustडीवाय पाटील इंजिनीअरिंगमध्ये टेक्निकल इव्हेंट उत्साहात adjust१०५ माजी नगरसेवकांचा संजय मंडलिकांना पाठिंबा adjustशाहू छत्रपती मंगळवारी अर्ज भरणार, महाविकास आघाडीकडून मोठे शक्तिप्रदर्शन ! adjustमहायुतीचे शक्ती प्रदर्शन ! मंडलिक, मानेंचा उमेदवारी अर्ज दाखल !! adjustप्रकाश आवाडेंची माघार, धैर्यशील मानेंना पाठिंबा ! adjust हातकणंगलेसाठी रात्रीस राजकारण चाले ! मुख्यमंत्र्यांनी घेतली कोरे, यड्रावकरांची भेट !! adjustसर्व्हेवर राजकारण चालत नाही, जनता सर्वेसर्वा- खासदार मानेंचा आवाडेंना टोला adjustही निवडणूक देशाच्या विकासाची, म्हणून मत मोदींना-हसन मुश्रीफ
Screenshot_20240226_195247~2
schedule29 Jan 23 person by visibility 330 categoryराजकीय
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा गडहिंग्लजमध्ये ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांचा सत्कार 
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी केली. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा मूलमंत्र शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांना दिला. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांनुसार मार्गक्रमण करून गाव तिथं शाखा, घर तिथं शिवसैनिक अशा पद्धतीने शाखांची स्थापना करा. संघटना बांधणीतून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करा नक्कीच जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. 
  बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा गडहिंग्लज येथे नूतन ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार मेळावा मेळावा आज पार पडला. 
क्षीरसागर पुढे म्हणाले, " आगामी काळात ग्रामपंचायत, तालुका, नगरपालिका पातळीवर आवश्यक निधी देवून लोकांना आवश्यक सोयीसुविधा देण्याचे काम करू. नवनियुक्त सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी निवडणुकीतील वैरत्व विसरून समाजहिताच्या कामाकडे  लक्ष देणे गरजेचे आहे. मतदारांनी दिलेली जबाबदारी आप-आपल्या ग्रामपंचायतीचा विकास करण्याकडे भर द्यावा. ग्रामपंचायतींच्या विकासासाठी शिवसेनेचे सरकार कटिबद्ध आहे. "
 यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष तालुका गडहिंग्लज यांच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष  क्षीरसागर यांच्या हस्ते नवनियुक्त सरोळी गावचे सरपंच अस्मिता अशोक कांबळे, उपसरपंच, मारुती पाटील, सदस्य लीला आवडण, सविता देसाई, प्रभावती शिट्याळकर, कुंबळहाळ गावचे उपसरपंच बाळासो येणेचवंडी, सदस्य शरद पाटील, सचिन कांबळे, यशवंत पाटील, विठ्ठल पाटील, खमलेट्टी गावचे ग्रामपंचायत सदस्य शिवराज खैरे, सुनिता घुगरे, कविता कोरे, निलजी गावचे ग्रामपंचायत सदस्य अजयकुमार मजगी, बाळगोंडा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. 
यावेळी जिल्हाप्रमुख राजेखान जमादार, उपजिल्हाप्रमुख अनिरुद्ध रेडेकर, उदय भोसले, किशोर घाटगे, गडहिंग्लज शहरप्रमुख अशोक शिंदे, तालुकाप्रमुख संजय संकपाळ, तालुका संपर्कप्रमुख सागर मांजरे, कागल तालुकाप्रमुख सुधीर पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, अमोल नार्वेकर उपस्थित होते.