+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!!
Screenshot_20240226_195247~2
schedule28 Sep 22 person by visibility 224 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब या सामाजिक संस्थेच्यावतीने रविवारी (ता.२ ऑक्टोबर) ट्रायथलॉन आणि ड्यअथलॉन या स्पर्धा होणार आहेत. कोल्हापुरात या स्पर्धा सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत होतील. या स्पर्धेमध्ये दोन किलोमीटर पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१ किलोमीटर धावणे अशी स्पर्धा आहे. अशी माहिती क्लबचे अध्यक्ष चेतन चव्हाण, आकाश कोरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राजाराम तलाव येथे दोन किलोमीटर पोहणे, राजाराम तलाव ते तवंदी घाट ९० किलोमीटर सायकलिंग व शिवाजी विद्यापीठ रोडवर 21 किलोमीटर धावणे अशी स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत ७५० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. प्रत्येक सहभागी स्पर्धकास किट व रिफ्रेशमेंटची व्यवस्था केली आहे.विजेत्यांना फिनिशर्स टी शर्ट, मेडल व प्रमाणपत्र मिळणार आहे. विजय कुलकर्णी, खुशबू तलरेजा उपस्थित होते.