+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule02 Aug 22 person by visibility 757 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडील ५८ प्राथमिक शाळांतील १८६ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. मंगळवारी, (ता.२ ऑगस्ट) बदलीची प्रक्रिया राबविण्यात आली. या बदली प्रक्रियेत १३ मुख्याध्यापकसह पदवीधर शिक्षक, सहाय्यक शिक्षक, उर्दू विषयक शिक्षकांचा समावेश आहे.
महापालिकेच्या वि. स. खांडेकर विद्यालय या शाळेत ही बदली प्रक्रिया पार पडली. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त विनायक औंधकर, प्रशासनाधिकारी डी. सी. कुंभार यांच्या नियंत्रणात या बदल्या करण्यात आल्या. सर्वसाधारणपणे एका शाळेत सात वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांची बदली करण्याचा प्रशासनाने निकष आहे. कोरोना कालावधीत बदली प्रक्रिया पूर्णपणे थांबवली गेल्याने बदलीपात्र शिक्षकांची संख्या यावेळी वाढली आहे.
प्राथमिक शिक्षण समितीकडून बदली बाबतची सविस्तर माहिती संगणकीकृत सादर करण्यात आली. बदली करताना प्रत्येक शिक्षकाला स्क्रीनवर रिक्त पदांच्या शाळेची यादी दाखविण्यात आली व शाळा निवड करण्याची संधी देण्यात आली. बदली प्रक्रिया पारदर्शकपणे यशस्विरित्या पार पडली. प्राथमिक शिक्षण समितीच्या रसुल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, उषा सरदेसाई, बाळासाहेब कांबळे, अविनाश लाड यांनी हे कामकाज पाहिले. याप्रसंगी प्राथमिक शिक्षक संघाचे शहर नेते सुनील गणबावले, शिक्षक संघाचे शहराध्यक्ष आर. टी. पाटील, सरचिटणीस दिलीप माने, शिक्षक समितीचे राज्य नेते सुधाकर सावंत, उमेश देसाई, संजय पाटील, पुरोगाामी शिक्षक संघटनेचे शहराध्यक्ष व  मुख्याध्यापक विलास पिंगळे, द्रोणाचार्य पाटील,  आदी उपस्थित होते. दरम्यान जे शिक्षक सेवानिवृत्तीच्या उंबरठयावर आहेत, आजाराने ग्रस्त आहेत, दिव्यांग आहेत. त्यांना बदली प्रक्रियेतून सवलत दिली आहे. ५३ वर्षावरील शिक्षक व मुख्याध्यापकांना सध्याच्या ठिकाणी पुन्हा नियुक्ती केली.
...........................
वयोमानामुळे सहा मुख्याध्यापकांची सध्याच्या ठिकाणीच नियुक्ती
तेरा मुख्याध्यापकांच्या बदल्या करण्यात आल्या. तेरापैकी पाच मुख्याध्यापकांना वयोमानामुळे सध्याच्या ठिकाणी पुन्हा नियुक्ती करण्यात आली. यामध्ये लक्षतीर्थ वसाहत येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील गणबावले, जोतिर्लिंग विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका माणका जाधव, वि.स.खांडेकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शामला पवार, कर्मवीर भाउराव पाटील विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्मिता खानोलकर, बोंद्रेनगर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नीता भाडळेकर यांचा समावेश आहे तर मुख्याध्यापक दस्तगीर मुल्ला, आशालता खाडे, अनुराधा शिंत्रे, भारती सुर्यवंशी यांना मुख्याध्यापकपदी समायोजन केले. मुख्याध्यापक रवींद्र हाळिज्वाळे, नंदिनी साळुंखे यांची अन्यत्र बदली झाली.