+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule02 Sep 22 person by visibility 616 categoryजिल्हा परिषद
प्रशासनातील अधिकारी-पदाधिकारी सहभागी होणार, तीस नोव्हेंबरपर्यंत उपक्रम
 महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत व्यतीत करून त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' हा उपक्रम एक सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार असल्याची माहिती  जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली  आहे.
या उपक्रमात प्रधान सचिव (कृषी), आयुक्त (कृषी), कृषी संचालक, कृषी विद्यापीठांचे कुलगुरु, विद्यापीठांचे विभाग प्रमुख, कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता, विभागीय आयुक्त, विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा), कृषी विकास अधिकारी, कृषी उपसंचालक, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) व इतर जिल्हास्तरीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी (महसूल), उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी सहभागी होणार आहेत. कृषी विभागाचे अधिकारी महिन्यातून तीन दिवस तसेच महसूल, ग्रामविकास व इतर विभागांचे अधिकारी महिन्यातून एक दिवस गावांना भेटी देतील. अधिकारी, पदाधिकारी यांनी गावाची निवड केल्यानंतर गावातील शासकीय, निमशासकीय, अशासकीय संस्था, गावातील बँक, सोसायटी, दुध संस्था, यांच्याकडून शेतकऱ्यांना कशाप्रकारे लाभ, मदत देतात याबाबत चर्चा करायची आहे. भेट देणाऱ्या गावामध्ये ग्राम कृषी विकास समितीची बैठक घेऊन त्यामध्ये पीक पद्धती, शेतकरी वापरत असलेले तंत्रज्ञान याबाबत सविस्तर चर्चा करतील.
गावातील शेतकरी उत्पादक कंपन्या, बचत गट, महिला बचत गट, गटशेती उपक्रम इत्यादी माध्यमातून यशस्वी झालेल्या उपक्रमांना भेटी तसेच शेतकऱ्यांना भेटून पुढील मुद्यांवर शेतकऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.