+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ?
Screenshot_20240226_195247~2
schedule17 Jan 23 person by visibility 829 categoryसामाजिक
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : "आम्हा पाचही भावंडांच्या आयुष्यात, करिअरमध्ये आईचा सिंहांचा वाटा आहे.आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक क्षेत्रात ‌ आईच्या संस्काराची शिदोरी उपयुक्त ठरली. आईच्या कष्टामुळेच जीवनाला आकार मिळाला. तीस -पस्तीस वर्षापूर्वीचे दिवस कष्टाचे होते, संपूर्ण साथ आईची होती. वडील डी.वाय‌.दादांचे आशीर्वाद अन आई सौ.शांतादेवी यांचे कष्ट आणि प्रेरणा यामुळेच आयुष्याला कलाटणी मिळाली. यामुळेच आई-वडिलांच्या नावाला साजेसे काम करू शकलो. नव्या पिढीला एकच सांगणे आहे,  माणूस कितीही मोठा होवो, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभो पण आयुष्यात आई-वडिल आणि शिक्षकांना विसरू नका" हे भावोत्कट उदगार आहेत डॉ. डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, पुणे येथील डॉ. डी .वाय पाटील विद्यापीठाच्या प्रकुलपती डॉ. भाग्यश्री पाटील आणि आमदार सतेज पाटील यांचे.
  निमित होते, डॉ. डी वाय पाटील ग्रुपतर्फे  सौ.शांतादेवी डी. पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रुपच्या विविध संस्थेमध्ये प्रथम वर्षासाठी सर्वोच्च गुणांनी प्रवेश घेतलेल्या  ६६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटपाचे. डॉ. संजय डी. पाटील यांच्या संकल्पनेतून हा शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. हॉटेल सयाजी येथे झालेल्या समारंभाला एक वेगळी भावनिक किनार होती. यासमारंभाच्या निमित्ताने डॉ. डी.वाय. पाटील यांच्या कुटुंबातील नातेबंधाची वीण किती घट्ट आहे त्याचे प्रत्यंतर घडले. या सोहळ्याच्या निमित्ताने पाटील कुटुंब एका व्यासपीठावर एकवटले. सौ.शांतादेवी डी.पाटील, मुले डॉ.संजय डी. पाटील,  भाग्यश्री पाटील, डॉ.डी. वाय. पाटील एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन पुणेच्या उपाध्यक्ष सुप्रिया पी. चव्हाण-पाटील, डॉ. डी. वाय. पाटील अकॅडमी शांतीनिकेतनच्या संचालिका राजश्री काकडे  आणि आमदार सतेज डी.पाटील. या पाचही भावंडांची कार्यक्षेत्रे वेगवेगळी. ज्या त्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाने आपआपला स्वतंत्र असा ठसा उमटविलेला. कार्यकर्तबगारीतून सगळ्यांची स्वतंत्र व्यक्तिमत्वे घडलेली. दरम्यान या सोहळ्याच्या निमित्ताने भावंडांचा एकमेकांविषयीचा आदरभाव, बहिण-भावातील उत्कट प्रेमाचा प्रत्यय आला.सोबतीलि यशस्वी जीवनाची वाटचाल उलगडली. समारंभात भाग्यश्री पाटील बोलत असताना त्यांनी भाऊ संजय डी. पाटील यांच्या उमेदीच्या कालावधीत संघर्ष ऐकवला. "दहावीत असताना संजय यांनी स्वतंत्रपणे काम करण्यास सुरुवात केली. बांधकामासाठी लागणारे सगळे साहित्य मोजून घ्यायचा. विटा, वाळूचे ब्रास प्रत्येक गोष्टीवर नजर असायची. त्यांनी खूप संघर्ष केला. आता त्यांनी खूप मोठे यश मिळवले. मोठमोठ्या इमारती साकारल्या. शिक्षण संस्था उभारल्या. हे सारे पाहून डोळ्याचे पारणे फिटते. आई-वडिलांच्या कष्टाचे सार्थक झाल्याची भावना मनी दाटते." असे उद्गार काढले. यावेळी संजय पाटील यांच्याकडे पाहताना त्यांचा कंठ दाटून आला. तत्काळ संजय पाटील बहिणीकडे गेले आणि गळाभेट घेतली. दोघांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या.आमदार सतेज पाटील यांच्यासह अन्य भावंडांच्या डोळ्यात अश्रू दाटले. या हृदयस्पर्शी प्रसंगाने संपूर्ण सभागृह भावूक बनले.  भाग्यश्री पाटील म्हणाल्या, "लहानपणी प्रत्येकाने काम केले आहे. श्रीराम सोसायटीत नेऊन  दूध घातले. आई खूप कष्टाची. आम्ही पाच भावंड एका ताटात जेवायचो‌.आई बुट्टीवर दहीभात करून ठेवायची. कधी बसने कधी सायकलने शाळेला जायचो. बसची वाट बघत बस स्टॉपवर थांबायचो. आईकडे जिद्द मोठी.तिला मुलांच्या शिक्षणाचा ध्यास. ३५-४० वर्षापूर्वी त्यांनी आम्हा भावडांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले. आमच्यासाठी कष्ट केले. स्वतःसाठी न जगता आमच्यासाठी जगली."  या कार्यक्रमाच्या निमित्ताने माणूस लहान असो की मोठा ! गरीब असो की श्रीमंत ! प्रत्येकाच्या जीवनात आईचे स्थान अनन्य साधारण असते. आईची शिकवण, संस्काराची शिदोरी आयुष्यभर पुरणारी. आईच्या कष्टाच्या बळावरच जीवनात यशाचे इमले उभे राहतात याचे प्रत्यंतर घडले.
 डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, "गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी सौ. शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप योजना सुरू केले. आमच्या जीवनाला आकार देणाऱ्या आई सौ.शांतादेवी डी. पाटील यांच्या जन्मदिनी त्यांच्याच उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ करताना विशेष आनंद होत आहे. पुढील वर्षापासून प्रथम वर्षाला सर्वोत्तम ठरणारा विद्यार्थी त्यासाठी पात्र ठरेल. चार वर्षानंतर या शिष्यवृत्तीची एकूण रक्कम तीन कोटीच्या घरात पोहोचेल यंदा ६६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे. चार वर्षात ३२५ विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळेल."
आमदार सतेज पाटील यांनी " आयुष्याच्या आतापर्यंतच्या यशामध्ये आईचा सिंहाचा वाटा आहे. दादांचे आशीर्वाद आईची प्रेरणा त्यामुळे आयुष्याला कलाटणी मिळाली. अपयशाने नाउमेद व्हायचे नाही आणि आनंदाने हुरळून जायचं नाही ही आई-वडिलांची शिकवण कायम मनात कोरली गेली‌. यामुळेच जमिनीशी नातं कधी आमचं तुटलं नाही. आज ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे त्यांनी आयुष्यात मोठे होऊन गरीब विद्यार्थ्यांनाही मदत करावी, हाच या शैक्षणिक उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे."असे सांगितले.
 स्कॉलरशिप कमिटीचे अध्यक्ष व आमदार ऋतुराज पाटील, उपाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, सदस्य कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, डॉ. के प्रथापन, कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, अधिष्ठाता डॉ.आर.के. शर्मा व सचिव पी.डी.उके यांच्या उपस्थितीमध्ये केक कापून शाांतादेवी डी. पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच त्यांच्या जीवनप्रवासावरील चित्रफीत बसविण्यात आली. प्रा. मधुगंधा मिठारी व प्रा.राधिका ढणाल यांनी सूत्रसंचालन केले.