+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule19 Jan 23 person by visibility 470 categoryमहानगरपालिका
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीचा प्रचार वेगावला आहे. या निवडणुकीत राजर्षी छत्रपती शाहू सत्तारुढ पॅनेल आणि विरोधी राजर्षी शाहू शिक्षक सेवक परिवर्तन पॅनेलमध्ये थेट लढत होत आहे. पतसंस्थेच्या १५ जागेसाठी दोन्ही पॅनेलचे मिळून ३० उमेदवार रिंगणात आहेत.
 रविवारी (२२ जानेवारी) सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल येथील मतदान केंद्र येथे मतदान आहे. पतसंस्थेचे ४१३ सभासद मतदार आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये सत्तारुढ आघाडीला तेरा तर विरोधी पॅनेलला दोन जागा मिळाल्या होत्या. यंदा दोन्ही पॅनेलने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. सत्तारुढ आघाडीचे नेतृत्व प्राथमिक शिक्षक समिती करत आहे. प्राथमिक शिक्षक समिती, उर्दू शिक्षक संघटना व सेवक यांनी एकत्र येऊन राजर्षी शाहू सत्तारुढ पॅनेलची स्थापना केली आहे. सत्तारुढ आघाडीने यंदा सात विद्यमान संचालकांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.
 विरोधी राजर्षी शाहू शिक्षक सेवक परिवर्तन पॅनेलमध्ये शिक्षक संघ, पुरोगामी शिक्षक संघटना आणि समविचारी शिक्षक सेवक एकत्र आहेत. यामध्ये शिक्षक संघाच्या सात जागा तर पुरोगामी शिक्षक संघटना पाच जागा लढवत आहे. समविचारी शिक्षक सेवकांना तीन जागा दिलेल्या आहेत. विरोधी पॅनेलमध्ये विद्यमान संचालक दिलीप माने व विजय माळी यांना उमेदवारी दिली आहे.
 राजर्षी छत्रपती शाहू सत्तारुढ पॅनेलमधील उमेदवार- वसंत आडके, संजय कडगावे, राजेंद्र गेंजगे, कुलदीप जठार, उमर जमादार, उमेश देसाई, संजय जोतिबा पाटील, सुनील नारायण पाटील, सुधाकर सावंत, लक्ष्मण पवार, मनीषा पांचाळ, भारती सूर्यवंशी, संदीप सुतार, सुभाष धादवड, मनोहर सरगर हे उमेदवार आहेत. तर विरोधी राजर्षी शाहू शिक्षक सेवक परिवर्तन पॅनेलमध्ये प्रकाश गावडे शिवाजीराव गुरव, संजय टोणपे, अजितकुमार पाटील, प्रदीप पाटील, नेताजी फराकटे, सुनील भांबुरे, दिलीप माने, विजयकुमार माळी, रवींद्र साळोखे, सुजाता पोवार, स्वाती लंगडे, विजय सुतार, प्रभाकर लोखंडे, विलास पिंगळे हे उमेदवार आहेत.