+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule20 Jan 23 person by visibility 422 categoryमहानगरपालिका
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेमध्ये सत्तारुढ आघाडीच्या संचालक मंडळांनी उत्कृष्ट कामकाज केले आहे. गेल्या सात वर्षात संचालक मंडळाची कामगिरी सुवर्ण अक्षराने नोंद करण्यासारखी आहे. सत्तारूढ आघाडीचा कारभार हा सभासदांच्या हिताचा आणि संस्थेच्या विकासाचा आहे" असे स्पष्ट भूमिका श्री राजर्षी शाहू सत्तारुढ पॅनेलचे प्रमुख सुधाकर सावंत व‌ व कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील कुरणे यांनी मांडली.
 महापालिका प्राथमिक शिक्षक सेवक पतसंस्थेसाठी रविवारी (२२ जानेवारी) मतदान होत आहे. सत्तारुढ आघाडीचे पॅनल प्रमुख सुधाकर सावंत म्हणाले, " पतसंस्थेच्या सभासदांचा सत्तारुढ आघाडीच्या कामकाजावर विश्वास आहे. संचालक मंडळाने सभासद हिताच्या वेगवेगळ्या योजना आखल्या. संपूर्ण कर्जमाफी योजना, एमपीएससी शिक्षक यासाठी विमा संरक्षण, सभासदांना तत्काळ कर्ज सुविधा या माध्यमातून चांगल्या कामकाजाची प्रचिती घडवली आहे. सगळ्यांना विश्वासात घेऊन संस्थेचा कामकाज सुरू आहे. विरोधकांमधून होणारा अपप्रचार हा निव्वळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुरू आहे. पतसंस्थेचे सभासद सत्तारुढ आघाडीला निश्चित विजय करतील."
 कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील कुरणे म्हणाले, " सत्ताधारी संचालक मंडळाचा कारभार पारदर्शक आणि सभासदाभिमुख आहे. सभासदांना केंद्रस्थानी ठेवून वेगवेगळ्या योजना आखले आहेत. शिक्षक समिती, कास्ट्राईब, उर्दू शिक्षक संघटना, आणि सेवक अशा सर्व घटकांना एकत्र करून सर्वसमावेशक पॅनेल तयार केले आहे. विचारात सभासदांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे."