+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule28 Jan 23 person by visibility 324 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
गळा आवळून पत्नीच खून केल्याचा संशय व्यक्त केल्याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या गुन्ह्यात अश्विनी एकनाथ पाटील (वय २८, रा. दोनवडे, ता. करवीर) या महिलेचा मृत्यू झाला असून तिचा पती एकनाथ कृष्णा पाटील (रा. दोनवडे) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. प्रकाश बापू माने (वय ४२, रा. केर्ले, ता. करवीर) या महिलेच्या चुलत्याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली. अश्विनी हिला दोन मुली असून मुलगा होत नसल्याने पती एकनाथ तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. त्याच्या वागण्याने अश्विनीच्या माहेरच्या नातलगांनी एक बैठक घेऊन एकनाथला समजावलेही होते. आज शनिवारी सकाळी पाण्याचा मोटारचा शॉक लागून अश्विनीचा मृत्यू झाला आहे, असा निरोप एकनाथने अश्विनीच्या नातलगांना दिला. नातलग सीपीआर हॉस्पिटलमध्ये आल्यावर एकनाथने अश्विनीचा मृत्यू विजेचा शॉक लागून झाला असे सांगितले. त्यानंतर नातेवाईकानी खोदून विचारले असता अश्विनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे सांगितले. सीपीआरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत पाटील यांनी मृतदेहाची तपासणी केली असता गळ्याला पांढरा स्कार्फ बांधल्याचे लक्षात आले. त्यांनी स्कार्फ काढला असता गळावर गळफास लावल्याचे काळे व्रण दिसले. त्यानंतर अश्विनीचे चुलत सासरे प्रकाश माने यांनी एकनाथ पाटील याच्या विरोधात करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर एकनाथ पाटील याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.