+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule19 Dec 22 person by visibility 627 categoryगुन्हे
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
करवीर तालुक्यातील सडोली खालसा या गावात नवरदेवाने लग्नाच्या वरातीत बारा बोअरच्या बंदुकीतून हवेत गोळीबाराचा प्रकार घडला. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. नवरदेव अजयकुमार  हे  जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अशोकराव पवार यांचा  पुत्र आहे.
करवीर पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. चौदा डिसेंबर रोजी करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांना मोबाईलवर सोशल मीडियवरुन एक व्हिडिओ आला. या व्हिडिओची खातरजमा करण्यासाठी त्यांनी पोलीस कर्मचारी बालाजी भूषण हांगे यांना सांगितले. बालाजी हांगे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन सडोली खालसा या गावी पोहोचले. त्या ठिकाणी अजयकुमार अशोकराव पवार पाटील यांच्या लग्नाची वरात सुरू होती. पोलिसांनी वरातीत सहभागी झालेल्या नागरिकाकडे गोळीबाराची खातरजमा करून घेतली. त्यांनी जयकुमारांना गोळीबाराचा व्हिडिओ दाखवला. पवार यांनी वरातीत हवेत बंदूक उडविल्याची कबुली दिली. लग्नाच्या वरातीत बंदुकीने हवेत गोळीबार करायची आमची परंपरा आहे. आपल्याकडे बंदुकीचा परवाना असून बंदुकीतून ब्लॅंक काडतूस उडवले असल्याची कबुली दिली. तसेच बंदूक घरात ठेवली असल्यासही  सांगितले. गर्दीच्या ठिकाणी हवेत गोळीबार केल्याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
दरम्यान ब्लॅंक काडतुसामधील छरे आणि दारू काढली जाते. ब्लॅंक काडतूस हे बंदूकीची चाचणी घेण्यासाठी वापरली जाते. या काडतुसाचा धोका नसतो असे बंदुक तज्ज्ञांनी सांगितले. तरीही गर्दीच्या ठिकाणी हवेतून गोळीबार केल्याचे समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.