+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!!
Screenshot_20240226_195247~2
schedule13 Jan 23 person by visibility 283 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांचे भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यात बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनचे योगदान महत्त्वपूर्ण राहील, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
 मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कॉफी टेबल बुकचे क्षीरसागर यांच्या हस्ते अनावरण झाले. "
राजेश क्षीरसागर म्हणाले,मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. यामध्ये गेली ७५ वर्षे मुंबईच्या विकासात हातभार लावणाऱ्या बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. एकीकडे बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशन अमृत महोत्सव वर्ष साजरे करत असताना, भारत देशही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष साजरे करत आहे. यानिमित्ताने देशाला महासत्ता बनविण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदीनी केला असून, त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरविण्यामध्ये येणाऱ्या काळात बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशन महत्वाची भूमिका बजावेल.." याप्रसंगी क्षीरसागर यांची राज्याच्या "मित्र" संस्थेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल बॉम्बे इंडस्ट्रीज असोसियेशनच्यावतीने सत्कार करण्यात आला.
 मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याची चर्चा करून बॉम्बे इंडस्ट्रीज असोसियेशनला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाहीही क्षीरसागर यांनी दिली. 
यावेळी बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष नेव्हिल संघवी, नूतन अध्यक्ष आशिष गांधी, सेंट्रम ग्रुपचे चेअरमन जसपाल बिंद्रा, कोकुयो कॅमलिन लिमिटेडचे व्हॉइस चेअरमन श्रीराम दांडेकर, बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कोठारी, सचिन शहा, अमित कुमार उपस्थित होते.