+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशाहूंचे शक्‍तीप्रदर्शन ! जनसागराच्या साक्षीने विजयाचा निर्धार पक्‍का!! adjustस्वाभिमानीचे शक्तीप्रदर्शन, शेट्टींनी बैलगाडीतून जाऊन अर्ज भरला adjustमुख्यमंत्र्यांनी घेतली महाडिकांची भेट, शिरोलीत दोन तास खलबतं ! adjustडीवाय पाटील इंजिनीअरिंगमध्ये टेक्निकल इव्हेंट उत्साहात adjust१०५ माजी नगरसेवकांचा संजय मंडलिकांना पाठिंबा adjustशाहू छत्रपती मंगळवारी अर्ज भरणार, महाविकास आघाडीकडून मोठे शक्तिप्रदर्शन ! adjustमहायुतीचे शक्ती प्रदर्शन ! मंडलिक, मानेंचा उमेदवारी अर्ज दाखल !! adjustप्रकाश आवाडेंची माघार, धैर्यशील मानेंना पाठिंबा ! adjust हातकणंगलेसाठी रात्रीस राजकारण चाले ! मुख्यमंत्र्यांनी घेतली कोरे, यड्रावकरांची भेट !! adjustसर्व्हेवर राजकारण चालत नाही, जनता सर्वेसर्वा- खासदार मानेंचा आवाडेंना टोला
Screenshot_20240226_195247~2
schedule09 Jan 23 person by visibility 348 categoryलाइफस्टाइल
कृष्णराज महाडिक ग्रुप आणि मुकबधिरांनी सुंदर चित्र रेखाटून भिंतींना दिला नवा लूक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापुरातील शहरातील अनेक शासकीय कार्यालयाच्या भिंती बकाल बनल्या आहेत. त्यामुळे शहर सौंदर्याला बाधा येत आहे. याबाबत कृष्णराज महाडिक यांनी महापालिकेच्या सहकार्याने अभिनव उपक्रम राबवला. चित्रकार आणि  मूकबधीरांना सोेबत घेत शहराचा मुख्य मार्ग असलेल्या स्टेशन रोडवरील रेल्वे स्टेशनची भिंत सुंदर निसर्ग चित्र रेखाटून बोलकी केली. यापुढेही शहरातील अनेक बकाल भिंतींचे रूप बदलणार असल्याचे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले.
महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त रविकांत अडसुळ यांची भेट घेवून स्टेशन रोडवरील पोस्ट ऑफिस नजीकची भिंत रंगवण्याबाबत मान्यता घेतली. या उपक्रमाला महापालिकेने पाठबळ दिले. महापालिकेच्यावतीने कर्मचारी बोलवून रंग आणि साहित्य देण्यात आले. दरम्यान कृष्णराज महाडिक यांनी स.म. लोहिया हायस्कूलमधील कर्णबधिर मुले आणि कोल्हापुरातील काही चित्रकारांना सोबत घेवून ही भिंत रंगवण्यास सुरूवात केली. ६० फुट लांबीच्या भिंतीवर चित्रकार आणि मुकबधिर कलाकारांचे कुंचले फिरू लागले. आणि हळूहळू या भिंतीचे रूप पालटले. निसर्गचित्र आणि भिंतीच्या मधोमध करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे चित्र रेखाटले गेले आहे. सर्वांनी मिळून त्यात रंग भरण्यास सुरूवात केली. आणि तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर या भिंतीचं रूपडे बदलले आहे. या परिसरातील वाहनधारक, नागरिक, प्रवासी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. अशा प्रकारचे उपक्रम यापुढेही निरंतर सुरू राहील्यास शहराच्या सौंदर्यात भर पडेल. तसेच मूकबधिर मुलांना चित्रांच्या माध्यमातून अशा सार्वजनिक ठिकाणी व्यक्त होता येईल, असे स.म. लोहिया मुकबधिर शाळेच्या मंगेशी माने या शिक्षिकेने सांगितले. या उपक्रमाच्या ठिकाणी महापालिकेचे उपायुक्त रविकांत अडसुळ यांनी भेट दिली. त्यांनाही भिंतीवर चित्र रेखाटण्याचा मोह आवरला नाही. कृष्णराज महाडिक यांच्या साथीनं त्यांनी भिंतीवर चित्र रेखाटली. यावेळी विपुल हळदणकर, अजय काटाळे, सत्यजित मोहिते, प्रणव मोरे यांच्यासह मुकबधिर शाळेच्या अश्‍विनी कुलकर्णी आणि विद्यार्थी उपस्थित होते.