+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल!
Screenshot_20240226_195247~2
schedule30 Sep 22 person by visibility 1442 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
शुक्रवार पेठ जैन गल्ली येथील एका महिलेचा मृतदेह बालिंगा ते शिरोली दुमाला या रस्त्यावरील पाडळी खुर्द या गावातील  शेतात सापडला. आरती आनंद सामंत (वय 45 ,रा. जैनमठ गल्ली शुक्रवार पेठ) असे हे महिलेचे नाव आहे. पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
पाडळी खुर्द (तालुका करवीर) येथील बिगा नावाच्या शेतात मृतदेह सापडला. घातपाताचा प्रकार असावा असा पोलिसांना संशय आहे. करवीर पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सरकारी रुग्णालयात हलविला आहे.
करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द येथील राजवर्धन पाटील यांच्या मालकीच्या शेतात मुख्य रस्त्यापासून पाचशे मीटर अंतरावर 45 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह गावातील पोलीस पाटील आणि ग्रामस्थांना आज शुक्रवारी सकाळी आढळून आला.पोलीस पाटीलांनी तात्काळ करवीर पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृत महिलेच्या पर्समध्ये सापडलेल्या आयडीकार्डमुळे मृतदेहाची ओळख पटली असून आरती अनंत सामंत असे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत महिलेच्या डोक्याच्या मागील बाजूस खोलवर जखम झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. तसेच हाताला खरचटले आहे. अंगावरील दागिने लंपास केलेला संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. 
आरती सामंत या मूळच्या करवीर तालुक्यातील आंबेवाडी या गावच्या असून त्या सध्या शुक्रवार पेठ जैन गल्लीत राहत होत्या. त्यांना दोन मुली असून एक विवाहित मुलगी असून दुसरी मुलगी पुण्यात शिक्षण घेत आहे.