+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा ! adjustदूध वाढीसाठी कुशिरेचं पुढचं पाऊल, करनाल, कोलारमधून आणले पशुधन adjustचेतन नरकेंची निवडणुकीतून माघार ! भविष्यात चार पावलांची झेप घेण्यासाठी दोन पाऊल मागे !! adjustहॅटस ऑफ, यूपीएससीत कोल्हापूरच्या तिघांचे यश
Screenshot_20240226_195247~2
schedule30 Sep 22 person by visibility 658 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर येथील श्री शाहू मिल पुनर्जीवित करून ती सुरू करण्यात येणार असून मिलचा भोंगा पुन्हा एकदा कोल्हापूरांना ऐकू येणार असल्याचे वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
 मंत्री पाटील प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे , श्री शाहू मिल पुन्हा सुरू करून भोंगा सुरू करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहु स्मृती व विचार जतन समिती स्थापन  करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशी आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन व अटींची पूर्तता करून ही मिल पुनर्जीवित करून भोंगा सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. 
यामध्ये भोंगा वाजविण्याकरिता घ्यावा लागणाऱ्या शासकीय परवानग्यांच्या अधिन राहून प्रथम 6 महिन्यांसाठी महामंडळाची हरकत नाही. तसेच मिलच्या आवारात भोंगा योग्य ठिकाणी बसवण्यासाठी आणि संपूर्ण तांत्रिक बांबीची पूर्तता करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची जबाबदारी  समितीची राहील. या सर्व नियमांचे कटाक्षाने पालन करून ही प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी. असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.