+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश
Screenshot_20240226_195247~2
schedule24 Jan 23 person by visibility 472 categoryजिल्हा परिषद
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन-व्हाईस चेअरमन निवडीसाठी बुधवारी (२५ जानेवारी २०२३) बैठक होत आहे. चेअरमन व व्हाईस चेअरमनपदासाठी नावे निश्चित करण्यात आले आहेत. बुधवारी संचालकांच्या होणाऱ्या बैठकीत पदाधिकारी निवडीवर शिक्कामोर्तब होईल.
  श्री महालक्ष्मी सहकार सत्तारुढ पॅनेलने २१ पैकी २१ जागा जिंकल्या. दरम्यान सोसायटीच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी २५ जानेवारी रोजी नूतन संचालकांची बैठक होत आहे. अध्यक्षपदासाठी संचालक रणजीत पाटील यांचे नाव यापूर्वी घोषित झाले आहे. तर उपाध्यक्षपदासाठी इच्छुकांची मते मंगळवारी जाणून घेण्यात आली.
सत्ताधारी आघाडीचे नेतेमंडळी व मार्गदर्शक यांची मंगळवारी सायंकाळी बैठक झाली. आघाडीचे प्रमुख एम. आर. पाटील, विद्यमान चेअरमन राजीव परीट, ज्येष्ठ संचालक महावीर सोळांकुरे, शिक्षक नेते राजाराम वरुटे, कृष्णात कारंडे, एम. एम. पाटील, के.आर.किरुळकर, अजित मगदूम, किरण मगदूम, अनिल आवळे, श्रीमती शिर्के आदींच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली.
 यावेळी नूतन संचालकांनी आघाडीचे नेते मंडळी मार्गदर्शक जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे सांगितले. दरम्यान महालक्ष्मी सहकारी सत्तारूढ पॅनेलच्या समोर सर्व  संचालकांची मुलाखतीमध्ये चेअरमनपदासाठी  रणजीत पाटील तर व्हाईस चेअरमन पदासाठी मुजमिल अहमद नावळीकर यांच्या नावाला एकमुखी पाठिंबा दिल्याचे वृत्त आहे. नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या निवडीवर बुधवारी होणाऱ्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल.