+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश
Screenshot_20240226_195247~2
schedule12 Dec 22 person by visibility 366 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजनेतर्गत नागरी दळणवळण साधनांचा विकास या अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीमधील रस्ते, गटर, भुयारी मार्ग व फुटपाथ करण्याच्या कामांकरिता सादर करण्यात आलेल्या १०० कोटींच्या प्रस्तावास तांत्रिक मंजुरी मिळाली असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा मित्र संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.  
  कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील रस्ते, गटर, भुयारी मार्ग व फुटपाथ करण्याच्या कामांसाठी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून यापूर्वी दोन प्रस्ताव सादर करण्यात आले होते. परंतु, प्रस्तावातील काही त्रुटी आणि सुधारणा करून हा प्रस्ताव सरकारस्तरावर पुन्हा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. याबाबत आपण तत्कालीन नगरविकास मंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. यास सकारात्मक प्रतिसाद देत मुुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करून नव्याने सादर केलेल्या २३७ रुपयांच्या  कोटींच्या प्रस्तावास मान्यता दिली. यावेळी प्रस्तावाचे दोन टप्पे करण्याची सूचना महानगरपालिका प्रशासनास केली होती. या प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्य सरकारने पहिल्या टप्प्यातील कामांचा प्रस्ताव सद्याच्या डीएसआरनुसार सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पहिल्या टप्प्यातील प्रमुख १८ कामांसाठी महानगरपालिकेकडून १०० कोटींचा प्रस्तावाला तत्त्वत: मान्यताही दिली आहे. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेने उपसमितीचा ठराव करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तांत्रिक मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांनी या प्रस्तावा तांत्रिक मंजुरी दिली आहे. प्रस्ताव राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.
या निधीद्वारे कोल्हापूर शहरातील प्रमुख वर्दळीचे १८ रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण, गटर, ड्रेनेज लाईन व फुटपाथ यांचा सुनियोजित विकास करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री  शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून या प्रस्तावास लवकरच अंतिम मंजुरी मिळवून निधी मंजुरीसाठी पाठपुरावा करणार असल्याचेे क्षीरसागर यांनी  सांगितले.