महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त वडगाव नगरपरिषदमार्फत विविध स्पर्धेचे आयोजन केले होते. त्या स्पर्धेत वडगाव विद्यालय वडगाव येथील विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
प्रश्नमंजुषा स्पर्धेत लहान गटांमध्ये अथर्व अजित लाड व मोठ्या गटांमध्ये श्रेयश प्रकाश भिसेने प्रथम क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांना, शिक्षिका एस एस चव्हाण,शिक्षक ए. ए. पन्हाळकर, आर. जी. वासुदेव, एस. बी. नायकवडी यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर मोठ्या गटातील निबंध स्पर्धेत कुमारी आर्या सचिन गुरव या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला. या विद्यार्थिनील शिक्षिका आर आर पाटील, एम. व्ही. बारवडे, पी. एस. जाधव, आर. जी. वासुदेव, पी. ए. पाटील, शिक्षिका एस. एस. माने, ए. डी .जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले.
विद्यालयाचे प्राचार्य डी. के. पाटील, उपमुख्याध्यापक एस. डी. माने, पर्यवेक्षिका आर. आर. पाटील, परीक्षा विभाग प्रमुख डी. ए. शेळके, तंत्र विभागप्रमुख ए .एस. आंबी, कार्यालयीन प्रमुख के .बी. वाघमोडे यांची प्रेरणा मिळाली.