+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ?
Screenshot_20240226_195247~2
schedule14 Jan 23 person by visibility 317 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर: परदेशी शिक्षण कार्यक्रमांतर्गत आपत्कालीन व्यवस्थापन विषयक अभ्यासासाठी संजय घोडावत विद्यापीठातील चार विद्यार्थी १५ दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी इंग्लंडला रवाना झाले. हे विद्यार्थी टीसाईड युनिव्हर्सिटी यूके येथे प्रशिक्षण घेणार आहेत. यासाठीचा सर्व खर्च ब्रिटिश कौन्सिलने दिलेल्या फंडातून घोडावत विद्यापीठ करत आहे.
     या अगोदर टीसाईड युनिव्हर्सिटी, यूके आणि इतर भारतातील सहभागी विद्यापीठाद्वारे घोडावत विद्यापीठात आपत्कालीन व्यवस्थापन विषयक आंतरराष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली.यामध्ये आकाश वरदे, आकांक्षा तळवलकर, वरद बागेवाडी, वेदिका नरोटे या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. हे विद्यार्थी आता पुढील प्रशिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाले आहेत. या संदर्भात कुलगुरू डॉ. अरुण पाटील यांनी यापूर्वीच टीसाईड युनिव्हर्सिटी येथे भेट देऊन घोडावत विद्यापीठाचे संबंध दृढ केले आहेत. 
हे विद्यार्थी प्रशिक्षणा दरम्यान इंग्लंडमधील सार्वजनिक आरोग्य सुविधा स्थळांना भेट देतील. विमानतळ सुरक्षा, फुटबॉल स्टेडियमची सुरक्षा आणि काळजी घेणाऱ्या पथकासोबत बातचीत करून त्यांचा नाविन्यपूर्ण दृष्टिकोन समजून घेतील. विद्यार्थ्यांना चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. अरुण पाटील कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांनी शुभेच्छा दिल्या. यासाठी ग्लोबल एंगेजमेंटचे संचालक डॉ. केसरी तिवारी, अधिकारी अमृता हंदूर, सहयोगी अधिष्ठाता प्रा.संजय कुमार इंगळे यांनी परिश्रम घेतले.