+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...!
Screenshot_20240226_195247~2
schedule02 Oct 22 person by visibility 407 categoryशैक्षणिक
ओरोस येथील महामंडळ सभेत घोषणा, लवकरच राज्यस्तरीय शिक्षण परिषद- राजाराम वरुटे
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
“वीस पटाखालील शाळा बंद करु नयेत’यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे (माजी आमदार शिवाजीराव पा टील गट) राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघाचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा सिंधुदुर्गची महामंडळ सभा शिक्षक सोसायटी ओरोस येथे झाली. राज्य शिक्षक संघाचे नेते माधवराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.
संघाचे माजी अध्यक्ष राजाराम वरुटे यांनी,‘ शिक्षक संघातर्फे लवकर मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व ग्रामविकासमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये राज्यस्तरीय शिक्षण परिषद आयोजित केली जाईल. या परिषदेत शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक होणार असल्याचे सांगितले.
 राज्य सल्लागार वसंतराव हारुगडे यांनी भाषणात शिक्षक संघाच्या वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. राज्य कोषाध्यक्ष संभाजी बापट यांनी शिक्षक संघाची आगामी वाटचाल यासंबंधी मार्गदर्शन केले.
यावेळी राज्य नुतन कार्यकारिणीचा जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष जोईल सरव व त्यांच्या कार्यकारिणीतर्फे सत्कार करण्यात आला.