+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...!
Screenshot_20240226_195247~2
schedule04 Jan 23 person by visibility 341 categoryलाइफस्टाइल
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : येथील दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित स्वर्गीय मदन मोहन लोहिया सांस्कृतिक मंचतर्फे सहा ते आठ जानेवारी २०२३ या कालावधीत राज्यस्तरीय नाट्यगीत भावगीत गायन स्पर्धा होणार आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया, सचिव प्रभाकर हेरवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गायन स्पर्धेच्या सोबतीला संगीत मैफली रंगणार आहेत. संस्थेच्या राम गणेश गडकरी सभागृह व प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या प्रांगणात स्पर्धा व संगीत मैफली होतील‌. प्रवेश विनामूल्य आहे. स्पर्धेविषयी सांगताना विनोदकुमार लोहिया म्हणाले, "स्पर्धेचे यंदाचे नववे वर्ष आहे. वेगवेगळ्या गटात स्पर्धा होतील. नऊ ते चौदा वर्षे, पंधरा ते ३५ वर्ष, ३६ ते ५५ या वयोगटात या स्पर्धा होणार आहेत. बाहेरील स्पर्धकासाठी निवास व प्रवास सुविधा आहे. प्रत्येक गटातील पहिल्या क्रमांकाच्या तिन्ही विजेत्यांना बक्षीस स्वरूपात रोख रक्कम दिली जाते.
 दरम्यान शुक्रवारी (सहा जानेवारी) सायंकाळी सहा वाजता स्वर सांगाती प्रस्तुत त्रिवेणी ही मैफल होणार आहे. यामध्ये डॉ. शीतल धर्माधिकारी, डॉ. भाग्यश्री मुळे, गौरी कुलकर्णी गौतमी चिपळूणकर यांचा सहभाग आहे. शनिवारी (सात जानेवारी) स्वरनक्षत्र ही मैफल होणार आहे. सूरंजन खंडाळकर, अभिषेक पटवर्धन, स्वरदा गोडबोले, कल्याणी जोशी हे गायक कलाकार आहेत. रविवारी (आठ जानेवारी) रंगी रंगला श्रीरंग ही मैफल आहे. पंडित रघुनंदन पणशीकर, अपर्णा केळकर यांचा स्वरसाज तर विघ्नेश जोशी यांचे निरूपण आहे.
पत्रकार परिषदेला संस्थेचे सहसचिव एस. एस.चव्हाण, स्पर्धाप्रमुख डॉ. शीतल धर्माधिकारी, गोविंद पैठणे, मोहन भांडवले, गौरी कुलकर्णी, स्नेहा फडणीस, सुधाकर अतिग्रे, प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.