महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : संगीताचा ठेका, उत्साही वातावरण, बुद्धिमत्तेची कसोटी पाहणारे प्रश्न, मी प्रत्येक फेरीनुसार वाढणारी उत्कंठा अशा वातावरणात रंगलेल्या मानाचा मिस गोखले स्पर्धेत श्रावणी चावरे हिने मिस गोखले किताब पटकावला. गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयात श्रीमती सुशिलादेवी म. देसाई युवती सचेतना फौंडेशनच्यावतीने मिस गोखले स्पर्धेचे आयोजन केले होते. विजेत्या श्रावणी चावरेला, श्रीमती सुशिलादेवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. मंजिरी मोरे, शिक्षण प्रसारक मंडळाच्या कौन्सिल सदस्य, अंजली देसाई, शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख स्मिता सावंत - मांडरे, रश्मी साळगांवकर यांच्या हस्ते मानाचा क्राऊन ट्रॉफी, पुष्पगुच्छ व गिप्ट देऊन गौरविण्यात आले.
अनुक्रमे फस्ट रनर - समृध्दी मुरगूडकर, सेकंड रनर- मयूरी मिरजे, बेस्ट स्माईल संचिता जाधव, बेस्ट कॉन्फीडन्स कल्याणी मलकर, समीक्षा पाटील, बेस्ट हेअर सादिया आळतेकर यांचा सत्कार करण्यात आला.
प्रा. डॉ. मंजिरी मोरे यांनी मिस गोखले स्पर्धेच्या माध्यमातून युवतींना व्यक्तीमत्व विकास, सर्वांगीण
विकासाची प्रेरणा मिळते असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे उदघाटन रोपाला पाणी घालून करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर,
उपप्राचार्य एस. एच. पिसाळ, पर्यवेक्षक एस.एन.मोरे यांची उपस्थिती होती.
परिक्षक म्हणून प्रा. डॉ. मंजिरी मोरे, प्रा. एम.एम. कामत, प्रा. एस.एस. नागण्णावर, प्रा. एम.एल.धनवडे, प्रा. एस.ए. स्वामी, प्रा. एस. आर. गडदे, प्रा. ए.यु. पडवळ यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई, कौंन्सिल मेंबर प्रा. प्रमोद झावरे, बाळ डेळेकर, सुनिल देसाई,अजितराव मोरे, प्रा. आर. एच. पायमल यांची प्रमुख उपस्थिती होते. प्रा. परीनाज मुजावर, प्रा. रुबीना मुल्ला, संपदा लोहार यांनी सूत्रसंचालन केले.प्रा. रुबीना मुल्ला यांनी आभार मानले.