महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) शासकीय चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश विशेष कार्य अधिकारी लेखापरीक्षण मंडळ (पदुम) यांनी दिले आहेत. अहमदनगरचे विशेष लेखा परीक्षक बीएस मसुगडे यांचे या कामासाठी नियुक्ती केली आहे. शिवाय दहा दिवसात गोकुळचे लेखापरीक्षण पूर्ण करावे अशा सूचना आहेत.
गोकुळच्या विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी गोकुळचे शासकीय चाचणी लेखापरीक्षण व्हावे अशी मागणी केली होती. महाडिक यांनी गोकुळच्या प्रशासनाकडून आपणाला योग्य ती माहिती मिळत नाही अशी तक्रारी केली आहे. गोकुळच्या कामकाजासंबंधी प्रशासनाकडून काही कळवण्यात येत नाही असा आक्षेप नोंदवले आहे.
तसेच गोकुळच्या लेखापरीक्षणामध्ये अनेक त्रुटी आहेत. लेखापरीक्षणात अनेक बाबींचा उलगडा झाला नाही. खरे लेखे उघडकीस आले नाहीत असेही महाडिक यांची तक्रार आहे. महाडिक यांनी काही दिवसांपूर्वी "मी चार महिने गप्प होते कारण मला योग्य ती माहिती मिळत नव्हती. आता लवकरच गोकुळच्या कारभाराचा भांडाफोड करणार"असे फेसबुक पोस्ट केली होती. त्यानंतर काही दिवसातच गोकुळच्या शासकीय चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश निघाले आहेत. महाडिक यांनी दिलेल्या पत्रानुसार लेखापरीक्षा मंडळाकडून गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण होणार आहे. गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यापासून संचालिका महाडिक यांनी संघाच्या कारभाराविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण समिती महाडिक यांनी सत्ताधाऱ्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला होता. गोकुळ दूध संघाच्या नेते मंडळी पदाधिकाऱ्यावर आरोप केले होते.
राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर महाडिक गटाला ताकत मिळाले आहे. संचालिका शौमिका महाडिक या गोकुळ मध्ये विरोधकाची एक हाती खिंड लढवत आहेत. त्या भाजपच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत.