+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule21 Jan 23 person by visibility 378 categoryउद्योग
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ व गोशिमा सबक्लस्टरमध्ये प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि संशोधन या क्षेत्रात एकत्र काम करण्याच्या दृष्टीने सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारांतर्गत विद्यार्थी केंद्रित प्रशिक्षण व कौशल्य आधारित अभ्यासक्रम, उद्योगाशी निगडित कार्यशाळा, उद्योग समस्या निर्गमित करण्याकरिता विविध संशोधन प्रकल्प, शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम होतील.
  यावेळी कुलगुरु डी. टी. शिर्के यांनी हा सामंजस्य करार
विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी अतिशय महत्वाचा असून त्या अंतर्गत विद्यार्थी व शिक्षक हे तांत्रिक व उद्योगाशी निगडित नवनवीन ज्ञान निश्चितच अवगत करतील, असा विश्वास व्यक्त केला. प्र-कुलगुरु  पी. एस. पाटील यांनी या सामंजस्य करार अंतर्गत उद्योजकांनी विद्यापीठातील अत्याधुनिक उपकरणांचा वापर करून त्यांनी उत्पादनांची गुणवत्ता वाढवावी, तसेच प्रशिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी या करार अंतर्गत विशेष प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावेत, असे सुचविले. आयआयएफचे अध्यक्ष  सचिन शिरगावकर  यांनी गोशिमा सेंटरज्ञऑफ एक्सलन्समध्ये सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच आगामी काळात शिक्षकांच्या उन्नतीकरिता विविध कोर्सेस तयार करून ते शिवाजी विद्यापीठातील शिक्षकांना उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. मोहन पंडितराव यांनी करारा बद्दल माहिती दिली. विद्यापीठातील उद्योग कक्षाचे समन्वयक  प्रा.  एस. डी. डेळेकर यांनी सूत्रसंचालन  केले. कुलसचिव व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले.कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठातर्फे प्रा. एस. एच. ठकार , डॉ. पी. डी. राऊत, डॉ. के. डी. सोनवणे,  गोशिमा सब क्लस्टरचे अजित आजरी,  रणजित मोरे, अमोल यादव, विजय वसगडे, श्रीनिवास जोशी उपस्थित होते.