महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवसेना शिंदे गटातर्फे कोल्हापुरात रविवारी, (ता.२ ऑक्टोबर) ‘हिंदूगर्वगर्जना’ मेळावा होत आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, येथे सकाळी अकरा वाजता हा संपर्क मेळावा होत आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होणार आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यास मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.