+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...!
Screenshot_20240226_195247~2
schedule29 Nov 22 person by visibility 370 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनधी, कोल्हापूर : शतकोत्तर परंपरा लाभलेल्या दि कोल्हापूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी शिरीष दत्तात्रय कणेरकर, उपाध्यक्षपदी जयसिंग पांडूरंग माने यांची निवड झाली. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. शिरीष कणेरकर यांची तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली.
बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी आघाडीने एकतर्फी विजय मिळवला आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक झाली. अध्यक्षपदासाठी कणेरकर यांचे नाव संचालक सुभाष भांबुरे यांनी सुचविले. विश्वास काटकर यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी जयसिंग माने यांचे नाव सुनीता राउत यांनी सुचविले. त्यास संध्या घोटणे यांनी अनुमोदन दिले. बैठकीला संचालक मधुसुदन सावंत, राजन भोसले, संभाजी जगदाळे, रविंद्र धर्माधिकारी, नंदकिशोर मकोटे, यशवंतराव साळोखे, अभिजीत मांगुरे, प्रशांत शिंदे, नामदेवराव कांबळे आदी उपस्थित होते. निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण केली.