+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule19 Jan 23 person by visibility 2913 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या शासकीय चाचणी लेखापरीक्षणावरून पुन्हा एकदा महाडिक यांनी पाटील यांच्यातील वाकयुदध सुरू झाले आहे.‌ शासकीय चाचणी लेखापरीक्षकावरून विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी गोकुळच्या गेल्या पंचवीस वर्षातील कारभाराचे लेखापरीक्षण करावे असा टोला लगावला होता‌. आमदार पाटील यांच्या टीकेचा शौमिका महाडिक यांनी, "मला विचारायचं आहे, २५  वर्षातला कारभार काढण्यापासून तुम्हाला कोणी रोखलेलं? तरीही वैयक्तिक खुन्नस ठेऊन तुम्ही संघाची जेवढी बदनामी करायची तेवढी केलीच.. त्याचेही पुरावे माझ्याकडे आहेत." अशा शब्दात समाचार घेतला आहे.
 महाडिक यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे, "ते सगळं जाऊदे. पण ज्या टँकरच्या मुद्यावरून तुम्ही जिल्हाभर धिंगाणा घातला. त्या मुद्यावर तुमची सत्ता असताना मी पत्र दिलं होतं. काय भ्रष्टाचार आहे दाखवा. त्या विषयात तुमच्या या सत्तेत क्लीनचिट दिलेलं पत्र मला मिळालं. आजही माझं चॅलेंज आहे.तुम्ही आमचा भ्रष्टाचार दाखवा.हरकत नाही.पण मागच्या दोन वर्षाचा हिशोब मी मागणार‌. कारण या कालावधीत मी स्वतः संचालक आहे. पाच  वर्षासाठी जसे तुम्ही निवडून आले, तसंच मीपण संचालक म्हणून निवडून आले. त्याच माणसांनी मलाही संचालक म्हणून निवडून दिलं. मग माझ्या एकाही पत्राचं उत्तर देण्याचं धाडस तुम्ही का दाखवलं नाही ? तेव्हा वाटलं नाही का ? जनमताचा आपण आदर करावा ? यांनाही लोकांनी निवडून दिलंय.. हे शहाणपण तेव्हा सुचलं नाही का ? "
 महाडिक यांनी पुढे म्हटले आहे, " वायफळ बडबड सतेज पाटील: यांनी बंद करावी. बाकी सगळी उत्तरं मी सविस्तर एक-दोन दिवसात पत्रकार परिषद घेऊन नक्की देईन. त्यांनतर जिल्ह्याला कळेल. खरं कोण आणि खोटं कोण ? लक्षात ठेवा शौमिका महाडिक कधी विना पुराव्याची बोलत नाही.आणि बोलणार पण नाही."