+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustरविवारपासून शहरात महायुतीच्या प्रचाराची रणधुमाळी - राजेश क्षीरसागर adjustडोंगळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळा adjustकोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराला मिसळ पे चर्चेचा तडका adjustवाळवा-शिराळा तालुक्यात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे
Screenshot_20240226_195247~2
schedule30 Jan 23 person by visibility 409 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने रेकॉर्डवरील आरोपीसह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला पकडून जिल्ह्यातील सात घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले. त्यांच्याकडून एक लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
निरीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने पन्हाळा तालुक्यातील कोडोली काखे फाट्याजवळ सापळा रचून निकाजी अभिमान काळे (वय २६, रा. तुळजाभवानी मंदिर, गायरान, आष्टी ता. आष्टी, जि. बिड) आणि त्याचा सहकारी १७ वर्षाच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सोन्याची बोरमाळ, सोन्या चांदीचे दागिने, मोटार सायकल असा एक लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याकडून पन्हाळा पोलिस ठाणे हद्दीतील एक, शाहूवाडी पोलिस ठाण्यातील पाच असे सात गुन्हे उघडकीस आणले. पोलिस उप निरीक्षक शेष मोरे, पोलिस अंमलदार वसंत पिंगळे, हिंदूराव केसरे, संजय हुंबे, प्रशांत कांबळे, रणजीत कांबळे, असिफ कलायगार, संजय पडवळ, संतोष पाटील, अनिल जाधव, राजेंद्र वरंवडेकर, सायबर पोलिस ठाण्याकडील सुहास पाटील, रवींद्र पाटील, विनायक बाबर यांनी तपासात सहभाग घेतला.