+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही !
Screenshot_20240226_195247~2
schedule25 May 23 person by visibility 490 categoryशैक्षणिक
सरासरी ४.५० लाख रुपयांचे पॅकेज
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त ) महाविद्यालयाच्या स्थापत्य (सिव्हील)अभियांत्रिकी विभागातील ११ विद्यार्थ्यांची अदानी ग्रुप,'नीलसॉफ्ट लिमिटेड, पुणे', 'इन्फ्राप्लॅन प्रा. लि., पुणे' या कंपन्यांमध्ये निवड झाली. 
अदानी ग्रुप मध्ये संकेत माने व शिवतेज काळे या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.या कंपनीने विद्यार्थ्यांना ६.५ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज घोषित केले आहे. तसेच नीलसॉफ्ट कंपनी मध्ये निहालअहमद पिंजारी, अभिजित शांत , ओम पावशे , ओंकार वडाम , दिनेश आमले , वैष्णवी लोळगे , मानसी तिबिले या सात विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
कंपनीने विद्यार्थ्यांना साडे तीन  लाखाचे वार्षिक पॅकेज दिले आहे. इन्फ्राप्लॅन प्रा. लि., पुणे या कंपनीने नेहा नंदिवले व शीतल नादिगरे या दोन विद्यार्थिनींची निवड केली आहे. कंपनीने त्यांना अडीच लाखाचे वार्षिक पॅकेज दिले आहे.
महाविद्यालयाचे मध्यवर्ती ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर डॉ. अमित सरकार, विभाग प्रमुख डॉ. आदित्य खेबुडकर, स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्लेसमेंट समन्वय प्रा. गुरुप्रसाद चव्हाण, प्रा. शीतल वरुर, प्रा. रोहन नलवडे आणि प्रा. अभिजित उलागडे यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. केआयटीचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले, कार्यकारी संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जीन्नी, संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.