+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!! adjustगोकुळमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी
Screenshot_20240226_195247~2
schedule19 Jan 23 person by visibility 249 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " शहीद जवानांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती वाटप करण्याचा इंडो काउंट कंपनीचा उपक्रम आदर्शवत आहे. इंडो काउंट कंपनीने व्यवसायात नावलौकिक मिळवताना सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.'  असे उद्गार जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी काढले. 
  देशातील अग्रगण्य बेड लिनन उत्पादक इंडो काउंट कंपनीने "'करेंगे पूरे, सपने अधूरे' उपक्रमांतर्गत,शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान केली. इंडो काउंटच्या बुटीक लिव्हिंग ब्रँडने, वीर सेनानी फाउंडेशनच्या मदतीने, संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी २५ मुलांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात आली. कोल्हापूर, अहमदनगर नाशिक गडहिंग्लजसह वेगवेगळ्या भागांतून  मुले आली होती. 
यावेळी एनएनसी-कोल्हापूरचे ग्रुप कमांडर कर्नल विक्रम नलावडे, वीर सेनानी फाउंडेशनचे कर्नल विक्रम पत्की, इंडो काउंटचे कार्यकारी संचालक आणि सीईओ के. के. लालपुरिया, इंडो काउंटचे संचालक  कमल मित्र उपस्थित होते.
उपक्रमाबद्दल बोलताना, इंडो काउंटचे सीईओ आणि कार्यकारी संचालक  के.के.लालपुरिया म्हणाले, " सैनिकांच्या मुलांना शिक्षणाची भेट देताना आमचे हृदय आनंदाने आणि अभिमानाने भरून आले आहे. 'करेंगे पूरे, सपने अधूरे' हा उपक्रम म्हणजे शहीद जवानांचे एकही मूल त्यांच्या स्वप्नांच्या आणि आकांक्षांच्या बाबतीत मागे राहणार नाही, मला आशा आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावर म्हणाले, " जवानांच्या अतुलनीय शौर्याचा आणि देशसेवेचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. जवानांच्या कुटुंबीयांच्याप्रती प्रत्येकाच्या मनी आदराचा भाव आहे. कोल्हापूरच्या भूमीला शौर्याची, त्यागाची बलिदानाची मोठी परंपरा आहे. जवानांच्या कुटुंबियांच्या जिल्हा प्रशासन सदैव तत्पर आहे." याप्रसंगी जिल्हा समाज कल्याण अधिकारी चंद्रशेखर पांगे उपस्थित होते.