+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!! adjustगोकुळमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustडीवाय पाटील फार्मसीतर्फे रविवारी मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह adjustछत्रपतींच्या सुनेच्या मोटारीचे कुपेकरांच्या कन्येने केले सारथ्य adjustकोल्हापूरसाठी २३ ! हातकणंगलेसाठी २७ उमेदवार लढणार !!
Screenshot_20240226_195247~2
schedule14 Jan 23 person by visibility 226 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर:संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत रविवारी यजमान महाराष्ट्र विरुद्ध पश्चिम बंगाल यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही संघांनी ग्रुप चार या गटात सर्व सामने जिंकले असून रविवारी होणाऱ्या सामन्यात ग्रुप चारचा विजेता ठरणार आहे. हा सामना पाहण्यासाठी कोल्हापूरच्या फुटबॉल शौकिनानी मैदानावर महाराष्ट्र संघाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सोशल मीडिया वरून करण्यात येत आहे.
अखिल भारतीय फूटबॉल संघटना, नवी दिल्ली यांच्यावतीने व कोल्हापूर स्पोर्ट्‌स्‌असोसिएशन, कोल्हापूरच्या सहकार्याने भारतात प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या संतोष ट्रॉफी(पुरूष) ग्रुप-4 च्या फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियम, येथे सूरू आहेत. या स्पर्धेचा शेवटचा सामना रविवारी दुपारी साडेतीन वाजता महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन संघामध्ये होणार आहे. हा शेवटचा सामना रंगतदार होईल अशी अपेक्षा असून जो संघ जिंकेल तो ग्रुप-4 चा विजेता ठरणार असून तो संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे. त्यामुळे या सामन्याला महत्त्व आले आहे. दोन्ही संघाकडून आतापर्यंत उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन झालेमुळे हा सामना निश्र्वितच चुरशीचा होणार आहे
या सामन्यासाठी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी शाजी प्रभाकरन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणूकीमध्ये त्यांची बहुमताने सेक्रेटरी जनरल या पदावर निवड झालेली आहे. ते मुळचे केरळचे असून एल.एन.आय.पी.ई., ग्वॉल्हेर येथून त्यांनी फिजिकेल एज्यूकेशन या विषयात पी.एच.डी. घेतलेली आहे. यापूर्वी त्यांनी दिल्ली फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे काम केलेले आहे. दिल्ली युनायटेड एफ.सी., चंदगड फुटबॉल अॅकॅडेमीमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केलेले आहे. त्यांनी फिफाच्या साऊथ सेंटर एशिया डेव्हल्पमेंट ऑफिसर म्हणून काम पाहिलेले आहे. सामन्याच्या मध्यंतरास श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.