महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस चौक मिरजकर तिकटी येथील हुतात्मा स्तंभाजवळ नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेला थायलंडचे अर्थ मंत्रालयाचे सल्लागार चेतन नरके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव श्् शिवराज नाईकवडी आणि चाटे शिक्षण संस्थेचे भारत खराटे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त रविकांत आडसूळ , शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत , शहर उपअभियंता नारायण भोसले , कनिष्ठ अभियंता महानंदा सूर्यवंशी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच रसिका अमर पाटील, पल्लवी पाटील, सुमन गुरव, संगीता पाटील, अनिष जयसिंगराव पाटील, रोहित रघुनाथ पाटील यांचा सन्मानचिन्ह, गुलाब पुष्प आणि कोल्हापुरी फेटा बांधून सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना चेतन नरके म्हणाले,"क्रांतिकारकांनी क्रांती करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे.आता देशाला सुजलाम सुफलाम करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे..!! यासाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी या सर्व लोकप्रतिनिधींनी कार्यरत राहावे आणि आपल्या परिसराचा विकास प्रत्येकाने करण्याचा ठरवल्यास देशाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही...आणि हीच खरी देशसेवा ठरते..!!
पाहुण्यांचे स्वागत संस्थापक किसनराव कल्याणकर यांनी केले. हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दुर्वास कदम यांनी हुतात्मा क्रांती समितीच्या वतीने होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेचे संभाजीराव जगदाळे यांचा कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेचे शिवाजी ढवाण, बापू साळुंखे, लक्ष्मण मोहिते, सुनील हंकारे, डॉ. गुरुदत्त म्हाडगुत,अनिल कोळेकर, किशोर यादव , जयकुमार शिंदे,अर्जुन शिंदे, किरण भोसले उपस्थित होते. संस्थेचे कार्याध्यक्ष श्री रामेश्वर पतकी यांनी केले.